शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अडीचशे रुपयांची लस घेण्यात ज्येष्ठ नागरिक उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:41 IST

देशभरात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासनाकडून व्यापक उपाय योजना राबविण्यात येत असतानाच आता कोरोना प्रतिबंधक लसही दिली ...

देशभरात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासनाकडून व्यापक उपाय योजना राबविण्यात येत असतानाच आता कोरोना प्रतिबंधक लसही दिली जात आहे. त्यात पहिल्या आणि दुसºया टप्प्यात कोरोना नियंत्रणात सक्रीय सहभाग घेणाºया शासकीय कर्मचाºयांसह इतर कर्मचाºयांना १६ फेबु्रवारीपासून लस देण्यात सुरुवात करण्यात आली, तर १ मार्चपासून ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या दूर्धर आजारग्रस्त नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. शासकीय रुग्णालयांत ही लस मोफ त दिली जात असून, शासकीय रुग्णालयात अडीचशे रुपये खर्च करून ही लस दिली जात आहे. जिल्ह्यात १ मार्चपासून एकूण ४०७० लोकांना ही लस देण्यात आली. त्यात ३३५१ ज्येष्ठ नागरिक, तर ७१९ दूर्धर आजारग्रस्तांचा समावेश आहे. या लसीकरण मोहिमेत नोंदणी करण्यासाठी शासनाने को-विन २ हे मोबाईल अ‍ॅप विकसीत केले आहे. तथापि, खासगी रुग्णालयांत नोंदणीसाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद असल्याचे चित्र असून, २ मार्चपासून ८ मार्चपर्यंत केवळ ७०२ नागरिकांनी खासगी रुग्णालयांत ही लस घेतली.

---------

लस घेण्यात ज्येष्ठ नागरिक पुढे

जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयांत मिळून एकूण ४०७० ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयावरील दूर्धर आजारग्रस्तांनी ८ मार्चपर्यंत लस घेतली. त्यात ३३५१ ज्येष्ठ नागरिक, तर केवळ ७१९ दूर्धर आजारग्रस्त व्यक्तींचा समावेश होता. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे.

-----------------

महिलांचे प्रमाण ४० टक्के

शासनाने ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक आणि दूर्धर आजार ग्रस्त व्यक्तींसाठी १ मार्चपासून लसीकरण मोहिम सुरू करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात शासकीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांत मिळून ४०७० लोकांनी ही लस घेतली. त्यात २४७२ पुरुष आणि १५९८ महिला आहेत. अर्थात या लसीकरण मोहिमेंतर्गत लस घेणाºया महिलांचे प्रमाण ४० टक्के असल्याचे स्पष्ट होते.

----------------

कोट: शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी ज्येष्ठ नागरिकांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली. ही बाब समाधानकारक आहे. यामुळे कोरोना संसर्गाची भिती नष्ट होणार असल्याने आपण ही लस घेतली. इतरांनीही ही लस अवश्य घ्यावी.

-मुकूंदराव वलसे (८२)

ज्येष्ठ नागरिक,

---------

कोट: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाचे उपक्रम चांगले आहेत. आता ज्येष्ठांना शासकीय रुग्णालयांत मोफत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली आहे. आपण ही लस घेतली आहे. इतरांनीही ही लस घेऊन कोरोना नियंत्रणासाठी शासनाला सहकार्य करावे.

-राजपाल राठोड

ज्येष्ठ नागरिक (७२)

४०७०

जणांनी घेतली आतापर्यंत लस

------

शासकीय रुग्णालयात

३३६८

--------

खासगी रुग्णालयात

७०२

-------------

ज्येष्ठ नागरिक

३३५१

-------------

इतर

७१९

-----