वाशिम : शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाकडून शाळांना स्वयंअर्थसहायीत तत्वावर शासन मान्यता प्रदान करण्यासाठी जुलै २०१४ मध्ये प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्रुट्यांची पुर्तता केलेल्या प्रस्तावांना अद्याप शासनाने मान्यता प्रदान केली नाही. शैक्षणिक सत्र २०१५-१६ साठी जुलै २०१४ मध्ये राज्यभरातील संस्थांकडून शाळा मान्यतेसाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले होते. जिल्हास्तरीय समितीची छाननी झाल्यानंतर सदर प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांमार्फत मंत्रालयात पोहोचले. एवढेच नाही; तर राज्यस्तरीय समितीनेही त्या प्रस्तावांना शासन मान्यतेसाठी पत्र असल्याचे दाखवून हिरवी झेंडी दिली. मात्र, हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.
स्वयंअर्थसहाय्यीतचे प्रस्ताव धूळ खात!
By admin | Updated: April 1, 2017 16:41 IST