वाशिम : गत दोन वर्षातील १४0 कुटुंबांच्या दारी स्वयंरोजगार पोहोचविण्याची हमी घेणारी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सद्यस्थितीत आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत येऊन ठेपली आहे. फुलउमरी व पोहरादेवी या दोन ठिकाणी जमिनीचे मोजमाप व इतर सोपस्कार पूर्ण झाले तर उर्वरीत ठिकाणीचे सोपस्कार पार पाडणे वेटींगवर आहे. वसाहत योजनेचा आराखडा आणि प्रकल्प अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १४0 कुटुंबांना स्वयंघरी स्वयंरोजगार दिला जाणार असल्याचा दावा सामाजिक न्याय विभागाने केला आहे.
प्रकल्प अहवालात अडकला स्वयंरोजगार
By admin | Updated: May 17, 2014 23:13 IST