शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

‘एक जिल्हा, एक उत्पादन’साठी सोयाबीन पिकाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:27 IST

या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी, तसेच सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० ...

या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी, तसेच सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान स्वयंसहायता गटांना बीज भांडवल, तसेच लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार प्रती सभासद याप्रमाणे चार लाख रुपयांपर्यंत अनुदान देय राहील. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहायता गट आणि सहकारी उत्पादक, तसेच शासन यंत्रणा, किंवा खासगी उद्योग, आदी घटकांना लाभ घेता येईल. तसेच या घटकांतर्गत नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव ओडीओपी उत्पादनावर देता येतील. सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी स्थरवृद्धी, आधुनिकीकरण या प्रकल्पांचे प्रस्तावदेखील या योजनेमध्ये सादर करता येतील.

सद्य:स्थिती वैयक्तिक सुक्ष्म अन्न उद्योजकांनी एमआयएस पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. गट लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज निश्चित केलेल्या ‘एक जिल्हा, एक उत्पादन’साठी सादर करता येईल. या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १३०, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २२ व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३ असा एकूण १५५ प्रकल्पांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.