शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्पांतर्गत कारंजातील नऊ गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:28 IST

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा अंबाळकर होत्या. उपप्रकल्पात निवड करण्यात आलेल्या संबंधित नऊ गावांमध्ये ‘एक गाव, एक वाण’ या संकल्पनेवर ...

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा अंबाळकर होत्या. उपप्रकल्पात निवड करण्यात आलेल्या संबंधित नऊ गावांमध्ये ‘एक गाव, एक वाण’ या संकल्पनेवर भर देत कापूस उत्पादन केले जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी यावेळी दिली. कापूस मूल्य साखळी अधिक कार्यक्षम, सर्वसमावेशक व स्पर्धाक्षम करण्यासाठी प्रकल्प राबविला जात असल्याचे मंडळ कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनी सांगितले.

कारंजा तालुक्यातील वाई, वढवी, पोहा, जानोरी, पानगव्हाण, गायवळ, सोहळ, भडशिवनी, महागाव या नऊ गावांमध्ये कापसाच्या उत्पादनासाठी महाकॉट, तिरुमला जिनिंगची मदत घेतली जात आहे. ‘एक गाव, एक वाण’ ही संकल्पना अमलात आणण्यासाठी प्रशिक्षण दिले जात असून, त्यासाठी पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा यासह अन्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बियाणांच्या निवडीपासून पिकाची मशागत, किडींचे नियंत्रण, कापसाची वेचणी यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक मार्गदर्शन करीत आहेत. सदर कार्यशाळेस सरपंच अंबाळकर, उपसरपंच रवींद्र लाहे, प्रगतिशील शेतकरी रूपेश लाहे, विष्णू लाहे व गावातील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

रुई आधारित बाजारव्यवस्थेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून उत्पादित कापसाला योग्य मोबदला मिळवून देणे व कापसाचा स्मार्ट कॉटन ब्रँड विकसित करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी यावेळी सांगितले.