अनसिंग परिसरातील सापळी, पिंपळगाव , ब्रह्मा उमरा शम, सोंडा, खंडसिंग, एकांबा, जवळा इलखी शेलू बु ,शेलू खुर्द आदी गावांत मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन शेतकरी आहेत.निसर्गाने सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात साथ दिल्याने आणि सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी या वेळेस सोयाबीन पीक घेतले आहे.
आता सोयाबीन पीक संपूर्णपणे वाळलेले असून आता ते कापणीवर आलेले आहे; परंतु मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने सोयाबीन पिकामधूनच अंकुर फुटायला लागल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
----
तलाठी कार्यालय अनसिंग अंतर्गत गतवर्षीपेक्षा यावर्षी ३० टक्के सोयाबीन पेरा वाढला आहे. आता हे सर्व पीक कापणीला आले आहे; परंतु मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकाची कापणी करण्यात आली नाही त्यामुळे या पिकातून कोंब यायला लागले आहेत.तर काही सोयाबीन पीक काळे पडत आहे.त्यामुळे या पिकाला पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
- गजानन दगडू इंगळे, शेतकरी अनसिंग