शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे भेसळीच्या प्रकरणांत वाढ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:21 IST

महाबीजच्या मंगरुळपीर तालुक्यात  महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा  आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे  महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ  झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या  लॉटमधील बियाणे पेरणार्‍या शेतकर्‍याच्या शेतात  कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भेट दिली  असता. दोन शेतकर्‍यांच्या शेतात भेसळ असल्याचे  दिसून आले. त्यामुळे या संदर्भातील शेतकर्‍यांनी  केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ठळक मुद्देमंगरुळपीर कृषी विभागातील प्रकार शेतकर्‍यांच्या तक्रारी बेदखलच!

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: महाबीजच्या मंगरुळपीर तालुक्यात  महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा  आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे  महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ  झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या  लॉटमधील बियाणे पेरणार्‍या शेतकर्‍याच्या शेतात  कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भेट दिली  असता. दोन शेतकर्‍यांच्या शेतात भेसळ असल्याचे  दिसून आले. त्यामुळे या संदर्भातील शेतकर्‍यांनी  केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी  गोविंदा भगत यांनी यंदाच्या खरीप हंगामात खरेदी  विक्री समितीमधून पेरणीसाठी महाबीजचे ९३0५  वाणाचे तीन बॅग सोयाबीन विकत घेतले होते. सदर  बियाणे उगविल्यानंतर त्यामध्ये दुसर्‍या वाणाची झाडे  मोठय़ा प्रमाणात उगविल्याचे त्यांना दिसले. या संदर्भा त त्यांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या कृषी  अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर काही दिवसांनी महाबीजचे सहाय्यक्ष क्षेत्र  अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी  कार्यालयातील प्रतिनिधी, तसेच पंचायत समितीच्या  कृषी अधिकार्‍यांनी त्यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी  केली असता. गोविंदा भगत यांच्या शेतात ९३0५ हे  वाण ३0 टक्के, तर इतर मिश्र वाण ७0 टक्के  असल्याचे दिसले. हाच प्रकार वाडा फार्म शिवारातील  चार शेतकर्‍यांसोबत घडला. त्यांच्या शेतात भेसळीचे  प्रमाण कमी असल्याचे कृषी विभागाच्या पाहणी  करणार्‍या अधिकार्‍यांना दिसले. त्यावरून गोविंदा  भगत यांच्यासह पाचही शेतकर्‍यांबाबत घडलेल्या  प्रकाराचा एक संयुक्त अहवाल पंचायत समितीच्या  कृषी अधिकार्‍यांनी तयार करून वरिष्ठ  अधिकार्‍यांकडे पाठविला. उपरोक्त शेतकरी गोविंदा भगत यांनी खरेदी विक्री  समितीकडून ज्या लॉटमधील बियाणे खरेदी केले,  त्याच लॉटमधील बियाणेमंगरुळपीर तालुक्यात  सायखेडा येथील शेतकर्‍यांनीही खरेदी केले होते.  त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सायखेडा ये थील संबंधित शेतकरी पुरुषोत्तम काळे आणि गजानन  भगत यांच्या शेतांची पाहणी करण्याचे ठरविले.   कृषी  विभागाने सायखेडा येथील ज्या शेतकर्‍यांच्या शे तामधील सोयाबीनची पाहणी केली. त्यामधील  पुरुषोत्तम काळे यांच्या शेतात २८ टक्के, तर गजानन  काळे यांच्या शेतात १५ टक्के भेसळ असल्याचेही स् पष्ट झाले.

तक्रारकर्त्याला केले पंचनाम्यात सहभागीबियाण्यांत भेसळ असल्याची तक्रार करणार्‍या शे तकर्‍यालाच दुसर्‍या शेतकर्‍याच्या याच संदर्भातील  पंचनामा करताना सहभागी करून त्याची स्वाक्षरी  घेण्याची कामगिरी कृषी विभागाने केली आहे.  यासाठी कृषी अधिकार्‍यांनी बियाणे भेसळीची तक्रार  करणारे शेतकरी गोविंदा भगत यांच्या मुलास सोबत  नेले आणि पंचनामा करताना त्याच्या स्वाक्षर्‍याही घे तल्या. याबाबत शंका घेतल्यानंतर पंचायत समितीच्या  कृषी अधिकार्‍यांनी पंचनाम्यावरील  त्या स्वाक्षर्‍या  खोडून काढल्या; परंतु एका तक्रारकर्त्या शेतकर्‍याच्या  शेतातील पाहणीदरम्यान पंचनामा करताना दुसर्‍या  तक्रारकर्त्याच्या स्वाक्षर्‍या घेणे किंवा त्यांना पंचनाम्या त सहभागी करणे, हा प्रकारच अनाकलनीय आहे. 

सायखेडा येथील शेतकर्‍यांच्या शेताची पाहणी  करण्यासाठी आम्ही सहजच चांभई येथील तक्रारक र्त्या शेतकर्‍याच्या मुलास सोबत नेले. त्यांच्याकडून  स्वाक्षरी घेण्यात आली; परंतु त्यांनी शंका उपस्थित  केल्यानंतर त्यांची स्वाक्षरी खोडली आहे. यामध्ये शे तकर्‍याचे नुकसान करण्याचा कोणताच उद्देश नाही.

-पी. एस. शेळकेकृषी अधिकारी, पंचायत समिती मंगरुळपीर