शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘सेक्युरा ’ला आणखी ५८ कोविड रुग्णांचे पैसे करावे लागणार परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 11:45 IST

Secura Hospital News प्रशासनाच्या आदेशानंतर त्यातील १०८ रुग्णांना धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : ‘डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल’ म्हणून परवानगी मिळालेल्या येथील सेक्युरा हॉस्पिटलने १४९ रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेतले. प्रशासनाच्या आदेशानंतर त्यातील १०८ रुग्णांना धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्यात आली. तर ४१ लोकांचे पैसे अद्याप प्रलंबित आहेत. असे असतानाच भरारी पथकाने पुन्हा केलेल्या चौकशीत आणखी ५८ रुग्णांकडून ४.३३ लाखांचे अतिरिक्त शुल्क आकारल्याचे निष्पन्न झाले असून ते पैसेही ‘सेक्युरा’ला संबंधित कोविड रुग्णांना परत करावे लागणार आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांनी कोविड बाधितांवर उपचारासाठी आकारावयाचे कमाल दर निश्चित करून दिले आहेत. मात्र, सेक्युरा हॉस्पिटल येथे कोविड बाधित रुग्णांवर उपचाराचे देयक वाजवी शुल्कापेक्षा अधिक दराने आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार देयक तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकाने सेक्युरा हॉस्पिटल येथे भरती असलेल्या व उपचार घेऊन घरी परतलेल्या सर्व कोविड बाधित रुग्णांच्या देयकांची तपासणी केली. पथकाच्या अहवालावरून १४९ रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अतिरिक्त दराने देयक आकारणी झाल्याचे दिसून आले. ही रक्कम १० लाख ४८ हजार ७३ रुपये एवढी होती. दरम्यान, ‘सेक्युरा’ने १४९ पैकी १०८ रुग्णांना धनादेशाद्वारे अतिरिक्त दराने आकारलेली रक्कम अदा केली असून त्यातील ४१ रुग्णांना पैसे परत करण्याची कार्यवाही सुरू आहे.अशातच भरारी पथकाने इतर कोविड बाधित रुग्णांच्या देयकांची तपासणी केली असता आणखीन ५८ रुग्णांसोबतही असाच प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार संबंधितांना अतिरिक्त दराने आकारलेली ४ लाख ३३ हजार ५७ रुपये एवढी रक्कम सेक्युरा हॉस्पिटलला परत करावी लागणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार कैलास देवळे यांनी दिली.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल