लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शिक्षणाधिका-यांअभावी वाशिम येथील माध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले असून, शिक्षकांच्या वेतनासह अन्य कामे निकाली निघण्यासाठी या विभागाला शिक्षणाधिका-यांची प्रतीक्षा आहे.शिक्षक भरती व अन्य कारणांमुळे मध्यंतरी माध्यमिक शिक्षण विभाग चांगलाच चर्चेत आला होता. तत्कालिन दोन शिक्षणाधिकाºयांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर वाशिम येथील शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार घेण्यास अधिकारी शक्यतोवर टाळाटाळ करतात, अशी चर्चा आहे. साधारणत: नऊ महिन्यांपूर्वी कायमस्वरुपी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून आर.डी. तुरणकर हे रूजू झाले होते. आॅगस्ट महिन्यात त्यांची अमरावती येथे बदली झाल्याने वाशिम येथून मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कार्यमुक्त केलेले नसतानाही ते अमरावती येथे बदलीच्या ठिकाणी रूजू झाले. त्यामुळे वाशिम येथे गत १५ दिवसांपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार कुणाकडेही सोपविण्यात आला नाही. त्यामुळे सर्व कामकाज ठप्प पडले आहे. शिक्षकांचे वेतन व अन्य कामे ठप्प असल्याने संस्थाचालकांनादेखील गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक संघाच्या विविध संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती यांच्यासह वरिष्ठांकडे निवेदन देऊन शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार सक्षम अधिकाºयांकडे सोपविण्याची मागणी रेटून धरली. या मागणीची दखल म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) प्राचार्य नागरे यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार दिल्याचे सांगण्यात येते. सोमवारी ते पदभार स्वीकारतील, असे सूत्रांनी सांगितले. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात उपशिक्षणाधिकाºयांची पदेदेखील रिक्त असल्याने कामकाजाचा खोळंबा होत आहे. उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी ही दोन्ही पदे रिक्त असल्याने माध्यमिक शिक्षण विभाग ‘वाºया’वर असल्याचे दिसून येते. शिक्षकांचे वेतनही रखडले असून, यासंदर्भात शिक्षक संघटनांनी यापूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन दिलेले आहे. रिक्त पदांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी सांगितले.
माध्यमिक शिक्षण विभागाला शिक्षणाधिका-यांची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 20:59 IST
वाशिम: शिक्षणाधिका-यांअभावी वाशिम येथील माध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले असून, शिक्षकांच्या वेतनासह अन्य कामे निकाली निघण्यासाठी या विभागाला शिक्षणाधिका-यांची प्रतीक्षा आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाला शिक्षणाधिका-यांची प्रतीक्षा !
ठळक मुद्देमाध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प शिक्षकांचे वेतन अडकले; शासनाकडे पाठपुरावा सुरू