शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेत दानशुरांचा ओघ ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST

मागील वर्षी २२ मार्च रोजी देशभरात एक दिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण ...

मागील वर्षी २२ मार्च रोजी देशभरात एक दिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे देशभरातील लाखो कामगार, मजुरांचा रोजगार हिरावला गेला होता. अशीच परिस्थिती वाशिम जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झाली होती. परिणामत: लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी उद्योजक, राजकीय नेते, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन गरजू , गोरगरिबांना घरोघरी, वाडया, वस्त्यांमध्ये जाऊन अन्यधान्य, किराणा किट असे साहित्य वाटप करून मदतीचा हात दिला होता. तसेच कोरोनाचा फ्रन्टलाईन वर्कर म्हणून सामना करणाऱ्या पोलीस, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका यांना मास्क, सॅनिटायझर, साबणयुक्त आरोग्य किट वाटप करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात रोजगार हिरावल्याने मोठ्या शहरातून आपापल्या गावी पायदळ परत जाणाऱ्या मजुरांची उपासमार लक्षात घेऊन विविध ठिकाणी भोजन व इतर साहित्य वितरण करण्यात आले. या तुलनेत यावर्षी अशी मदत देताना कुठलेही राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते अपेक्षित प्रमाणात आढळून आले नाहीत. यावरून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दानशूरता घटली असल्याचे दिसून येत आहे‌. आजही बऱ्याच लोकांचा विशेषतः व्यवसाय दीड वर्षांपासून बंद आहे. समाजातील दानशूरता घटली असली तरी या व्यवसायातील लोकांना किमान शासनाकडून तरी मदत मिळणे अपेक्षित आहे.