शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जलस्वराज्यच्या दुसर्‍या टप्प्यात वाशिम जिल्ह्याला ‘खो’

By admin | Updated: June 5, 2014 23:30 IST

वाशिम जिल्ह्यातील जलस्वराज्य मोहीमे अतर्गत पात्र गावे राहणार वंचित.

वाशिम : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजलाचा पुरवठा व्हावा व विशेष पाणी टंचाईतून त्यांची सुटका व्हावी यासाठी राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत ५00 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये राबविण्यात येणार असलेल्या जलस्वराज्य योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हयाच्या समावेश करण्यात आला. तथापि, जलस्वराज्य योजनेचा पहिला टप्पा राबविलेल्या वाशिम जिल्हयाचा या योनजेत समावेश न करुन खो देण्यात आला आहे.यामुळे जिल्हयातील ५00 पेक्षा कमी लोकसंख्येची कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेली गावे ती सुविधा होण्यापासून वंचित राहणार आहेत. जलस्वराज्य योजनेच्या सन २00४ ते २0११ दरम्यान राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्यात जिल्हयातील १0५ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली.त्या टप्प्यात लहान-मोठी गावे घेऊन स्थानिक पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत कामे करून घेण्यात आली.त्याचा या गावामधील हजारो लोकांना लाभ मिळाला.           आता जलस्वराज्य योजनेच्या दुसर्‍या टप्यात ५00 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या टंचाईग्रस्त गावे व वाडया(वस्त्या)करिता टंचाई कालावधीसाठी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातील रायगड, रत्नागिरी पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, बुलडाणा, नागपूर व चंद्रपूर या १२ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.          सदर टप्प्यासाठी निवड झालेल्या राज्यातील १२ जिल्ह्यामधील मागील तीन वर्षात टंचाईस्थिती असणार्‍या व टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आलेल्या व इतर कोणत्याही स्वरुपाची नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित नसलेल्या गावांमध्ये योजनेची कामे केली जाणार आहेत.           वाशिम जिल्हयात ५00 पेक्षा कमी लोकसंख्येची १२८ गावे आहेत त्यापैकी कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेली तब्बल ९१ गावे आहेत. त्यापैकी अनेक गावातील ग्रामस्थांना दरवर्षी उन्हाळयात गावातील विहिरी आटल्यामुळे दुरवरच्या विहिरींवरुन पाणी आणावे लागते. या टप्प्यात जिल्हयाचा समावेश झाला असता तर या गावांना योजनेचा लाभ मिळून तेथील नागरिकांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली असती.