शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुसर्‍या टप्प्यात मालेगाव, मानोरा मंगरूळपीरमध्ये गणेश विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:28 IST

वाशिम : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असणार्‍या गणरायाला दुसर्‍या टप्प्यात बुधवारी  मंगरूळपीर, मानोरा, मालेगावसह ग्रामीण भागात भावपूर्ण निरोप देण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असणार्‍या गणरायाला दुसर्‍या टप्प्यात बुधवारी  मंगरूळपीर, मानोरा, मालेगावसह ग्रामीण भागात भावपूर्ण निरोप देण्यात आला. मालेगाव : मालेगाव शहरातील श्री विसर्जन मिरवणुकीला ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. रात्री ११ वाजेपर्यंत श्री विसर्जन पार पडले. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील २२ गावांत श्री विसर्जन पार पडले. सकाळी श्री गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत गणेश भक्तांसाठी ठिकठिकाणी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.  मंगरूळपीर : मंगरुळपीर येथे ६ सप्टेंबर रोजी वाजत-गाजत गणरायाला निरोप देण्यात आला. या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सात मंडळांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम मानाचा गणपती म्हणून तालुक्यात स्थान असलेल्या बिरबलनाथ संस्थान आवारातील बिरबलनाथ गणेश मंडळाच्या मूर्तीचे पूजन उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.  मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता.मानोरा : शहरातील सात सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने विसर्जन मिरवणूक पार पडली. भाविकांनी गणरायांना भावपूर्ण निरोप दिला. ६ सप्टेंबर रोजी ‘श्रीं’ची आरती करून विसर्जनाकरिता सातही सार्वजनिक गणेश मंडळ दिग्रस चौकात एकत्र आले होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी अनसिंग येथे गणेश विसर्जन पार पडणार आहे.