शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १३४ केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. याकरिता जिल्ह्यात ...

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. याकरिता जिल्ह्यात १३४ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सध्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस लसीच्या उपलब्धतेनुसार दिला जात आहे. मात्र, यापूर्वी ज्यांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोससाठी पुरेसा साठा सर्व १३४ लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीचा दुसरा डोस घ्यावा.

------------------

दोन्ही लसी सारख्याच परिणामकारक व सुरक्षित : जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनावरील लस हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे लसीबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून १८ वर्षांवरील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे यावे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी सुरक्षित असून त्या सारखेच काम करतात. रुग्णाला लस दिल्यानंतर दोन्ही लसीचा फायदासुद्धा एकसारखाच होतो. कोरोना लसीसंदर्भात पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनी विहित कालावधीत दुसरा डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे. तसेच अद्याप एकही डोस न घेतलेल्या नागरिकांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस. यांनी केले आहे.

...............

विहीत कालावधीत दुसरा डोस घेणे गरजेचे : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीरात निर्माण होते. पुरेशा प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लसींचे दोन्ही डोस विहीत कालावधीत घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी २८ दिवसानंतर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस, तसेच कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी ८४ दिवसांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घ्यावा. जिल्ह्यातील १३४ लसीकरण केंद्रांवर पहिल्या व दुसऱ्या डोससाठी पुरेशा लसी उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

............

दोन्ही डोस घेतल्यानंतरच पुरेशी रोगप्रतिकारशक्ती

जिल्ह्यातील २१ हजार नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र

सर्व केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांसाठी पहिला डोसही उपलब्ध