वाशिम : करमणूक कराची थकित रक्कम न भरल्याच्या कारणाहून सिटी केबल नेटवर्कच्या वाशिम कार्यालयाला वाशिम तहसीलच्या पथकाने २0 फेब्रुवारीला सील ठोकले असून, २५ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. करमणूक कराचा ४६ लाख २३ हजार ६५ रुपये थकीत रकमेचा भरणा मुदतीच्या आत न केल्यामुळे जप्तीची कार्यवाही करण्याकरिता सिटी चॅनल कार्यालयात वाशिम तहसीलचे पथक गेले असता, सदर कार्यालय, कंट्रोल रुम बंद असल्याचे आढळले. त्यामुळे जप्तीची कार्यवाही करता आली नाही. संबंधिताना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, ते बाहेरगावी असल्याचे तहसीलच्या पथकाला सांगण्यात आले. यामुळे बंद असलेल्या कंट्रोलरुमला सील ठोकले. कारवाई तहसीलदार आशिष बिजवल यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार देवळे यांच्या पथकाने केली.
सिटी केबल कार्यालयाला सील ठोकले
By admin | Updated: February 25, 2016 01:49 IST