शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आॅटो-दुचाकीच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:35 IST

रिसोड : रिसोड ते मालेगाव रोडवरील चाफेश्वर मंदिराजवळील पुलाजवळ आॅटो व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने, आॅटोमधील ९ वर्षीय शाळकरी मुलगी ठार, तर चार जण जखमी झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी १० वाजेदरम्यान घडली.

ठळक मुद्देरिसोड-मालेगाव रस्त्यावर झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड ते मालेगाव रोडवरील चाफेश्वर मंदिराजवळील पुलाजवळ आॅटो व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने, आॅटोमधील ९ वर्षीय शाळकरी मुलगी ठार, तर चार जण जखमी झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी १० वाजेदरम्यान घडली. अनुष्का गजानन देशमुख रा. करडा असे मृतक मुलीचे नाव आहे.तालुक्यातील करडा येथून सकाळी ९ वाजताच्या सुमारास एमएच ३७ जी ३०७१ क्रमांकाच्या आॅटोने सात मुली शाळेसाठी रिसोडला निघाल्या. रिसोड शहरातील चाफेश्वर मंदिराजवळील वळण रस्त्यावर समोरून भरधाव येणाºया एमएच ३७ आर ६३८१ क्रमांकाच्या दुचाकीने आॅटोला समोरासमोर जबर धडक दिली.यामध्ये आॅटो उलटल्याने आॅटोमधील अनुष्का देशमुख हिच्या डोक्याला जबर मार लागला, तर अन्य चार जण जखमी झाले. अनुष्काला तातडीने रिसोड येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी तिला वाशिमला हलविण्याचा सल्ला दिला. वाशिम येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अनुष्काला मृत घोषित केले.या अपघातात शीतल शिवाजी धांडे (१५), अपेक्षा दगडू अंभोरे (१५), आॅटो चालक विनोद मोरे (३२), प्रतीक सचिन तुरूकमाने (७) असे चार जण जखमी झाले.अनुष्काचे शिक्षणाचे स्वप्न राहिले अधुरे ...!- अनुष्का ही स्थानिक भारत प्राथमिक शाळेत इयत्ता तिसºया वर्गात शिकत होती. अनुष्काच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, ते कापड दुकानात खासगी नोकरी करतात. मुलीला दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अनुष्काला रिसोड येथील भारत प्राथमिक शाळेत टाकले होते.- अनुष्कालादेखील शिक्षणाची गोडी होती. शिकून मोठे होण्याचे स्वप्न तिने पाहिले होते. गजानन देशमुख व कुटुंबानेदेखील स्वत: कष्ट सोसून तिचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालेय साहित्यासह अन्य मागण्या पूर्ण करीत आले होते. शिक्षणाची स्वप्ने रंगवित असतानाच, बुधवारी अनुष्काच्या आॅटोला अपघात झाला.- यामध्ये तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने दुपारी १२ वाजताच्या सुमारास अनुष्काच्या अपघाती निधनाची वार्ता देशमुख कुटुंबासह करडा गावात पोहोचली आणि सर्वांचे मन हळहळले. अपघाती निधनाने अनुष्काचे शिक्षणाचे स्वप्न अधुरेच राहिले. अनुष्काच्या मागे एक लहान भाऊ व आई-वडील असा परिवार आहे.