मंगरुळपीर (जि. वाशिम): धावत्या आॅटोतून पडून पाच वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी तालुक्यातील आसेगाव येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. आसेगाव येथील साईबाबा कॉन्व्हेंट येथे आसेगावसह परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यापैकी बरेच विद्यार्थी आॅटोने ये-जा करतात. ८ एप्रिल रोजी या कॉन्व्हेंटमधील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर एम.एच.ए ३२२४ या क्रमांकाच्या आॅटोने घरी जात असताना आसेगावनजिक पिंपळगाव इजारा येथील सतीश सुनील नवले हा पाच वर्षीय विद्यार्थी अचानक खाली पडला. जखमी अवस्थेत त्याला वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. शवविच्छेदनानंतर सतीशवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आॅटोतून पडून चिमुकल्या विद्यार्थ्याचा मृत्यू!
By admin | Updated: April 8, 2017 21:42 IST