शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

वाशिम : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुले घरातच आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, हट्टीपणा यासह ...

वाशिम : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुले घरातच आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, हट्टीपणा यासह पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता गतवर्षी पहिले ते चौथीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंदच राहिले. पाचवी ते बारावीच्या शाळा काही दिवसांसाठी सुरू होत्या. यंदादेखील विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मुले घरातच असल्याने मोबाईल व टीव्हीचे व्यसन जडत आहे. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावरही होत आहे. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढीस लागला आहे.आत्मविश्वास नसणे, नैराश्य, एकलकोंडेपणा, हट्टीपणा, कशातच मन न लागणे आदी समस्या जाणवत आहेत. पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.

००००००००००००००००

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली - १९६९०

दुसरी - २०१९८

तिसरी - १९६९८

चौथी - २११७७

पाचवी -२१०५२

सहावी - २११३६

सातवी -२१४३६

आठवी २१५९४

नववी २१९३६

दहावी २३५७९

००००००००००००००

मुलांच्या समस्या...

शाळा बंद असल्याने मित्रांबरोबर प्रत्यक्ष जाऊन खेळणे थांबले आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी होत आहेत. मुलांमधील ऊर्जेला सद्यस्थितीत पुरेशी वाट मिळत नाही. मुले जास्त हट्टी होत आहेत. मोबाईल, संगणक, टॅबच्या आहारी गेल्याने याचा विपरीत परिणाम त्यांच्या एकाग्रतेवरही होत आहे.