शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 19:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - विविध क्षेत्रातील कामगारांच्या पाल्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. कामगार कल्याण केंद्र वाशिम अंतर्गत येणा-या कामगारांनी या शिष्यवृत्तीसाठी पाल्यांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन केंद्र संचालक देवानंद दाभाडे यांनी केले.जिल्ह्यातील लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता वाशिम नगर परिषद जवळील कामगार कल्याण केंद्रात ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची शिष्यवृत्ती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - विविध क्षेत्रातील कामगारांच्या पाल्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. कामगार कल्याण केंद्र वाशिम अंतर्गत येणा-या कामगारांनी या शिष्यवृत्तीसाठी पाल्यांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन केंद्र संचालक देवानंद दाभाडे यांनी केले.जिल्ह्यातील लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता वाशिम नगर परिषद जवळील कामगार कल्याण केंद्रात शिष्यवृत्ती व विविध योजनांचे अर्ज उपलब्ध आहेत. या शिष्यवृत्तीचा लाभ कामगार कुटूंबियांना मिळावा त्याकरिता चार प्रकारात शिष्यवृत्ती योजना विभागण्यात आली आहे. सर्वसाधारण शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता नवीन उत्तीर्णपासून ते पुढील प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेत ६० टक्के  किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. सर्वसाधारण शिष्यवृत्ती नववी उत्तीर्ण ते पदवी, पदव्युत्तर, तांत्रिक पदविका, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती  देण्यात येईल. तसेच कामगार कुटूंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेकिरता गुणानुक्रम  अथवा टक्केवारीची अट नाही. परदेशी शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या कामगारांच्या पाल्यांना ५० हजारापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल. तसेच एमपीएससी, युपीएससी या स्पर्धा परीक्षेतील पूर्व परीक्षेचा टप्पा उत्तीर्ण करणाºया कामगार कुटुंबातील पाल्यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. क्रीडा शिष्यवृत्ती योजनांतर्गत कामगार कुटूंबियांनी क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. या सर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा मुंबई कामगार कल्याण निधी कायदा अधिनियम १९५३ च्या कक्षेत येणारे कामगार कुटूंबातील असणे आवश्यक आहे. या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी तसेच अधिक माहितीकरिता संबंधित पालक किंवा विद्यार्थ्यांनी कामगार कल्याण केंद्र, वाशिम येथे संपर्क साधावा, असे आवाहन केंद्र संचालक देवानंद दाभाडे, कर्मचारी बी.बी.पांगशे, जी.टी.आरु यांनी केले आहे.