शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरच्या सरपंच निवडीची सभा तहकूब!

By admin | Updated: February 28, 2017 01:38 IST

अंभोरे यांनी भरला वेळेत अर्ज; खोरणे पोहोचल्या वेळेनंतर!

शिरपूर जैन(वाशिम), दि. २७- येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला बोलाविलेली सभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली. तहकूब सभा २८ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. दरम्यान, सुनीता अंभोरे यांनी सरपंच पदासाठी वेळेपूर्वी अर्ज भरला, तर दुसर्‍या गटाकडून शोभा खोरणे या अर्ज भरण्यासाठी वेळेत पोहोचू शकल्या नाहीत.शिरपूर ग्रामपंचायतमध्ये १७ सदस्य असून, नऊ सदस्य डॉ. श्याम गाभणे व संजय शर्मा गटाचे आहेत, तर आठ सदस्य क्रांती पॅनल व तिसर्‍या आघाडीचे आहेत. या ग्रामपंचायतीवर गाभणे-शर्मा गटाच्या इंदूताई ईरतकर या सरपंचपदी विराजमान होत्या. ठरल्याप्रमाणे मागील महिन्यात इंदूताई ईरतकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सभा बोलाविण्यात आली होती. सरपंच पदासाठी विरोधी गटातर्फे सुनीता अंभोरे यांनी वेळेच्या आत अर्ज भरला, तर दुसर्‍या सत्ताधारी गटाकडून अर्ज भरण्यासाठी शोभा खोरणे या ठरावीक वेळेच्या आत पोहोचू शकल्या नाहीत. सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने अंभोरे यांची निवड होईल, असे समजले जात होते. मात्र, गणपूर्ती (कोरम) होत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर नागपूरकर यांनी सभा तहकूब करून २८ फेब्रुवारी रोजी सभा घेण्याचा निर्णय जाहीर केला. निवडणुकीदरम्यान कुठलाही वाद निर्माण होऊ नये म्हणून शिरपूरचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी मालेगावचे पोलीस निरीक्षक नाईकनवरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, आर.सी.पी.पी. १५ पोलीस, असा तगडा बंदोबस्त ठेवला. तहकूब झालेली सभा २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.