वाईगौळ : संस्कारांनी युक्त असलेली तरुण पिढी ही काळाची गरज आहे. या दशकात सुरू असलेल्या राजकीय, आर्थिक व नैतिक भ्रष्टाचाराला आळा फक्त संस्कार झालेल्या तरूण पिढीलाच घालता येईल असे प्रतिपादन हभप संतोष चैतन्यजी महाराज यांनी (दि.११) रोजी केले. महान तपस्वी श्री संत काशीनाथबाबा संस्थानवर सुरू असलेल्या भारतीय संस्कृती संस्कार शिबिरात ते बोलत होते. या प्रसंगी मोरेश्वर राठोड दिग्रस यांनी वैचारिक सत्रात विविध विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर बौद्धिक विकासाला चालणारे देणारे विविध खेळ विद्यार्थ्यांना शिकविले. आद्य गुरूमाऊली श्रीराम सेवा संघाचे महामात्र श्रीकृष्ण कल्याण राठोड हे कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. रस्त्याच्या कामाची चौकशी करावी मंगरूळपीर : शहरात नगरपालीकेअंतर्गत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करावी व शहरातील पेवर ब्लॉकच्या सर्व कामाची चौकशी करून अंदाजपत्रकापेक्षा जास्त देयके मंजूर केल्याबद्दल दोषींवर कारवाई करावी; अन्यथा २६ मे पासून बेमुदत उपोषणास बसू असा ईशारा सेना नगरसेवक अनिल गावंडे, रेखाताई गावंडे व अ.जाहेद यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. सदर निवेदनाचा आशय असा की, नगरपालीकेमध्ये एकच अभियंता असून त्याच्या भरोशावर कोट्यवधी रूपयाची कामे सुरू आहेत. पालीकेकडे कुठलीही सक्षम यंत्रणा नसताना बेकायदेशीर कामे सुरू आहेत. यावर वरिष्ठांचे कुठलेच नियंत्रण नाही. पालिकेत काम करणारे ठेकेदार सत्ताधार्यांना हाताशी धरून ठराविक टक्केवारी देऊन सर्रासपणे देयके मंजूर करतात. सध्या अकोला चौक ते बिरबलनाथ चौक मंदिरापर्यंत रस्त्याचे डांबरकरणाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे. अंदाजपत्रकानुसार या रस्ता कामात खडी व डांबराचा वापर दिसून येते नाही. कुठूनतरी विहिर फोडून आणलेले या रस्ता कामात वापरण्यात येत आहे. तेव्हा मंजूर अंदाजपत्रकानुसार कामाची पाहणी गुण नियंत्रण व दक्षता विभाग करण्यात यावी तसेच या रस्त्यावरील पाईपलाईनचे लिकेज बुजविण्यात यावे या रस्त्याच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय देयके अदा करू नये. तसेच वार्ड क्र. १ मध्ये काही लोकांनी खुल्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
संस्कारक्षण तरुण पिढी काळाची गरज- हभप संतोष महाराज
By admin | Updated: May 12, 2014 23:20 IST