शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी निराधार समितीचे पद रिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 19:58 IST

कारंजा लाड : कारंजा तालुकास्तरीय संजय गांधी तालुका स्तरीय निराधार योजना समितीचे अध्यक्षपदाकरीता नाव सुचविण्याचे पत्र वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने वाशिम पालकमंत्री तथा नामदार संजय राठोड महसुल राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांना नुकतेच पाठवले. त्यामुळे या महत्वाच्या पदावर कोणत्या राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांची निवड होते याकडे सर्व तालुका वासीयांचे लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्देनाव सुचविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिका-यांनी केला पत्रव्यवहारकोणत्या राजकीय पक्षाच्या पदाधिका-याची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा तालुकास्तरीय संजय गांधी तालुका स्तरीय निराधार योजना समितीचे अध्यक्षपदाकरीता नाव सुचविण्याचे पत्र वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने वाशिम पालकमंत्री तथा नामदार संजय राठोड महसुल राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांना नुकतेच पाठवले. त्यामुळे या महत्वाच्या पदावर कोणत्या राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांची निवड होते याकडे सर्व तालुका वासीयांचे लक्ष लागले आहे. संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी भाजपा पक्षातील तालुक्यातील पदाधिकारी निरंजन जर्नादन करडे होते. दरम्यान पोलीस निरीक्षक धनज बु. यांच्याकडून प्राप्त जातपडताळणी अहवाल २ फेब्रुवारी २०१६ नुसार निरंजन करडे यांचेवर गुन्हाची नोंदीचा उल्लेख केला नसल्याने त्यांनी संजय गांधी निराधार योजना अनुदान समितीवर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतू या पदावर झालेली नेमणुक अयोग्य असल्याची तक्रार अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांना प्राप्त झाला होता. त्यानुसार वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून निरंजन करडे रा. दोनद बु. यांच्यावर गुन्हा दाखल आहे कींवा नाही या बाबत सगोल तपासणी अहवाल मागविण्यात आला. वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या चरीत्रपडताळणी अहवालानुसार निरंजन करडे यांच्यावर धनज पोलीस स्टेशन अंतर्गत काही गुन्हांची नोंद असल्याचा तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये ही काही प्रकरणे न्याय प्रविष्ठ असल्याचा अहवाल दिला आहे. त्या अहवालानुसार निरंजन करडे यांचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद खारीज करण्यात येत असून त्यांच्या जागेवर दुस-या व्यक्तीचे नाव तात्काळ सुचवावे असे वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी यांनी २४ जुलै रोजी महसुल राज्यमंत्री तथा वाशिम पालकमंत्री यांचे खाजगी सचिव यांना पाठवलेल्या पत्रातून नमुद केले आहे.