शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या १८४६ बॅगची विक्री थांबविली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:43 IST

वाशिम : वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली असता, रिलिज ऑर्डर व आवश्यक ती कागदपत्रे आढळून न ...

वाशिम : वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली असता, रिलिज ऑर्डर व आवश्यक ती कागदपत्रे आढळून न आल्याने सोयाबीनच्या १८४६ बॅग तसेच कापूस बियाणाच्या २७० पॅकेटची विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने गुरुवारी दिले आहेत. या कारवाईमुळे कृषिसेवा केंद्रांचे धाबे दणाणले असून, अनियमितता करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही कृषी विभागाने दिला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची गैरसोय तसेच फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रमेश भद्रोड यांच्या पथकाने १९ मे रोजी वाशिम शहरातील तीन कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली. तपासणीदरम्यान १८ मे २०२१ रोजी विविध आठ कंपन्यांच्या पुरवठा झालेल्या सोयाबीन बियाणाचे आवश्यक दस्ताऐवजाची मागणी केली असता दस्ताऐवज उपलब्ध झाले नाहीत. यामुळे सोयाबीनच्या १८४६ बॅगची (किंमत ४४.९० लाख) विक्री थांबविण्यात आली आहे. या साठ्यास विक्री बंदचे आदेश देतानाच, पुढील तीन दिवसात आवश्यक कागदपत्रे, रिलिज ऑर्डर दाखविण्यात यावी अन्यथा पुढील कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला. २० मे रोजी मंगरूळपीर येथील चार कृषिसेवा केंद्रांची तपासणी केली असता, रिलिज ऑर्डर व अन्य कागदपत्रे आढळून न आल्याने सोयाबीनच्या ३०० बॅग तसेच कापूस बियाणाची २७० पॅकेटला विक्री बंदचे आदेश दिले. बियाणे नमुने तपासणीसाठी बियाणे चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ही कारवाई करताना जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक भद्रोड यांच्यासमवेत तंत्र अधिकारी प्रकाश पल्लेवाड उपस्थित होते.

०००

‘रिलिज ऑर्डर’ बंधनकारक !

विविध कंपन्यांचे सोयाबीन, कपाशी बियाणे विक्रीसाठी बाजारात आले आहे. बियाणे खरेदी केल्यानंतर यासंदर्भातील रिलिज ऑर्डर, बिल अशी कागदपत्रे असल्याशिवाय बियाणांची विक्री करू नये, अशा स्पष्ट सूचना कृषी विभागाने यापूर्वीच दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याची पडताळणी म्हणून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेकडून कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेण्यात येत आहे. गत दोन दिवसांत सात कृषिसेवा केंद्रांकडे रिलिज ऑर्डर व बिल अशी कागदपत्रे आढळून आली नाहीत. रिलिज ऑर्डर बंधनकारक असून, कृषिसेवा केंद्रांनी याचे पालन करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा कृषी विभागाने दिला.

००००००००