शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जनसामान्यांसाठी ‘सबका साथ, सबका विकास’ संमेलन!

By admin | Updated: July 8, 2017 01:48 IST

उपमहाप्रबंधक देशपांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विकासाची दृष्टी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्षांचा कालावधी उलटला. या कार्यकाळात देशातील शेतकरी दलित, व सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविण्यात आल्या. केंद्र शासनाने राबविलेल्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने वाशिममध्ये शनिवार ८ जुलै रोजी सबका साथ, सबका विकास संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे उपस्थित राहणार असल्याची माहिती कोलफोल्ड लिमिटेडचे उपमहाप्रबंधक प्रभाकर देशपांडे यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत दिली. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, उपमहाप्रबंधक ओ.पी. करोले देवेंद्रसिंह आदींची उपस्थिती होती. अधिक माहिती देताना देशपांडे म्हणाले की, गत तीन वर्षात केंद्र सरकारने अनेक साहसिक निर्णय घेऊन विकासकामांना गती दिली. गत तीन वर्षात एकही घोटाळा होऊ दिला नाही. पारदर्शक सरकार देऊन भ्रष्टाचार, काळे धन व दहशतवादाविरोधात धडक निर्णय घेतल्याचे सांगितले. जीएसटी, मेक इन इंडिया, कॅशलेस व्यवहार, डिजिटल व्यवहार आदी निर्णय घेऊन देशाला नवीन दिशा देण्याच्या प्रयत्न मोदी सरकारद्वारे करण्यात येत आहे. समृद्ध भारतासाठी तसेच शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी विविध योजना अमलात आणण्यात आल्या. या संदर्भात लेखाजोखा मांडण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे शनिवार ८ जुलै रोजी वाशिम येथे येणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, पाकलमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, उपाध्यक्ष बंटी वाघमारे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले आहे.