मालेगाव (वाशिम): धावता ट्रक अंगावर कोसळून पिता पुत्र ठार झाल्याची घटना १0 ऑक्टोबर रोजी मालेगाव तालुक्यातील डव्हा फाट्यानजीक घडली. शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास दगडी कोळसा घेवून जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. 0६ - ए क्यू- ९५१८ औरंगाबाद-नागपूर महामार्गाने मालेगावहून शेलूबाजारकडे जात असताना डव्हा फाट्यानजीक उतारावर अचानक उलटला. या चेंगरून विजय बाळकृष्ण गायकवाड आणि त्यांचा मुलगा विशाल यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही एम. एच.- ३७ -८६७८ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना, हा अपघात घडला. ट्रकमधील कोळशाखाली दबलेल्या पितापुत्रांना जेसीबीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतू त्यात अपयश आल्याने क्रेनच्या मदतीने दोघांचे मृतदेह सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातग्रस्त ट्रकचा चालक आणि क्लीनर घटनास्थळावरुन फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धावता ट्रक अंगावर कोसळून पिता-पुत्र ठार
By admin | Updated: October 10, 2014 23:32 IST