शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाने काेराेना, मृत्यू , बुरशीचा आजार हाेण्याची ग्रामीण भागात अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:29 IST

वाशिम : लसीकरण केल्यानंतर काेराेना, मृत्यू, बुरशीचा आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरत असल्याने या भागात ...

वाशिम : लसीकरण केल्यानंतर काेराेना, मृत्यू, बुरशीचा आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरत असल्याने या भागात कार्यरत आराेग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या अफवांमुळे लसीकरणावरही परिणाम दिसून येत आहे.

काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययाेजना केल्या जात आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क व सॅनिटायझर वापराबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काेराेनाकाळात सध्याच्या घडीला लस प्रभावी असून, लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. शहरात माेठ्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद मिळत असताना ग्रामीण भागात मात्र लसीमुळे विविध आजार उद्‌भवतात, मृत्यू ओढवताे, लसीमुळेच ताप येऊन काेराेना हाेताे, बुरशीजन्य आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याच्या अफवा पसरत आहेत. आराेग्य विभागातर्फे गावागावांत लसीकरण काेराेनावर उपाययोजना करून, जास्तीत जास्त नागरिकांनी करून घेण्याचे आवाहन केले जात असताना याकडे ग्रामीण भागातील नागरिक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.

....................

काय आहेत अफवा

काेराेना संसर्ग हाेताेय

ग्रामीण भागात सर्वात जास्त काेणत्या अफवेला पेव फुटले असेल तर लस घेतल्यानंतरच काेराेना संसर्ग हाेताे. यामध्ये सर्वाधिक वृध्द लाेकांचा समावेश असल्याचे दिसून आले.

मृत्यू ओढावताेय

लस घेतल्यानंतर काही जणांनाच ताप येत असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. परंतु ग्रामीण भागात काेराेना लस घेतल्यानंतर ताप येताेच व त्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू हाेत असल्याची काही जण चर्चा करताना दिसून येत आहे.

बुरशीजन्य आजार उद्‌भवताे

लसीकरणामुळे बुरशीजन्य आजार उद्‌भवत असल्याची चर्चा ग्रामीण भागात हाेत आहे. मला काहीच झाले नाही, आणि हाेणार नाही असे सांगून काही ग्रामस्थ लसीकरण करून कशाला आजार गळ्यात घ्यायचे, अशी चर्चा करीत आहेत.

...............

गावकरी संभ्रमात

लस घेतल्यानंतर विविध आजार होत असल्याची चर्चा शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. यामुळे गावकरीसुध्दा संभ्रमात दिसून येत आहेत. यासंदर्भात काही गावकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता यावर काेणीही बाेलायला तयार नाही. आम्ही लस घेतल्याचे सांगत आहेत. काही जण तर लसीकरणाबाबत काहीही बाेलण्याचे टाळत आहेत.

............

ग्रामीण भागात लसीकरणामुळे विविध आजार होत असल्याची चर्चा, अफवा पसरत असली तरी लसीकरणच काेराेनावर प्रभावी उपाय आहे. लसीकरणामुळे अनेक जणांचा काेराेनापासून बचाव झाला आहे. नाहक अफवा पसरविणे गुन्हा आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व इतरांना परावृत्त करणे म्हणजेच काेराेना संसर्ग राेखणे शक्य होेईल.

- डाॅ. मधुकर राठाेड,

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम