रिसोड: येथील आगारातून सुटणार्या लांब पल्ल्याच्या बसेस दररोज उशीरा सुटत असल्याने बसस्थानकावर प्रवाशांचा ताटकळत बसावे लागते.
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने सकाळपासूनच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. सुरक्षेच्या दृष्ट्रिकोनातून सर्वच लोक दूरचा प्रवास राज्य परिवहन मंडळाच्या बसने करणे पसंत करतात परंतु ऐन महत्वाच्या कामासाठी निघालेल्या प्रवाशाची येथील बसस्थानकावर आल्यावर वेळेवर बस न मिळाल्याने चांगलीच तारांबळ उडते गेल्या कित्येक दिवसांपासून या आगारातून सुटणार्या लांब पल्ल्याच्या बसेस पैकी एकहीबस ही नियमित वेळेवर सुटली नसल्याची माहिती आहे. वाहतुक नियंत्रण कक्षात असलेल्या नोंद वहीतील नोंदीनी ही बाब अधोरेखित केली आहे. रिसोड आगाराची स्थापना २0 डिसेंबर १९८६ रोजी झाली यावेळी आगारात केवळ चौदा बसेस होत्या गत तीन दशकाच्या कालावधीत महामंडळाचा व्याप वाढला आहे. आजमितीस आगारात ४५ बसेस आहेत. त्यातून ४८ शेडयुल सुरु करण्यात आले आहेत यामध्ये लांब पल्ल्याचे २६ शेडयूल सुरु आहेत. उर्वरित जिल्हयाअंतर्गत डे आउट शेडयुल सुरु असतात यात आठवडयातील सुट्टीचा एक दिवस वगळून १0४ चालक व १00 वाहक कर्तव्य बजावत. पुरेशा प्रमाणात चालक आणि वाहक उपलब्ध असतानाही दरारेज लांब पल्ल्याच्या बसेस उशिरा जात असल्याच्या कारणावरून या पुर्वीच्या काळात विभाग नियंत्रकांनी रिसोड आगाराचे दोन शेडयुल बंद करुन इतर आगाराला हस्तांतरित केले होते. याच बरोबर चार बसेस कमी केल्या होत्या. शिवाय चार चालक चार वाहकांचीही बदली इतर ठिकाणी केली होती यावेळी स्थानिक माध्यमानी हा विषय एस.टी.महामंडळाच्या लक्षात आणून देत सत पाठपुरावा करत बंद शेडयुल, बसेस व बदली झालेले वाहक चालक पुर्ववत याच आगारातून सुरु करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती तरी सुद्धा रिसोड आगाराच्या कामकाजात तिळ मात्र फरक झाला असल्याचे जाणवत नाही. रिसोड आगार अकोला विभागातुन इतर आगाराच्या तुलनेत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारे आगर म्हणून सर्वङ्म्रृत आहे. या परिस्थितीतही आगाराचे दैनंदिन उत्पन्न चार ते साडेचार लाखावर आहे प्रासंगीक कराराच्या दिवशी दिलेल्या बसेस मधुन एकूण आगाराचे उत्पन्न यापेक्षाही जास्त असल्याचे समजते ऐवडया मोठया उत्पन्नाच्या आगारावर प्रभारी आगार व्यवस्थापकांचे म्हणावे तेवढे लक्ष दिसून येत नाही योग्य नियोजन व कर्मचारी वर्गात समन्वय असल्यास आगाराचा कायापालट होवू शकतो परंतु, त्या करिता आगारातील अधिकारी व कर्मचार्यांमध्ये प्रामाणिकपणे स्वत:चे दैनंदिन कर्तव्य पार पाडण्याची दृढ इच्दा शक्ती असणे गरजेचे आहे आगारातील बसेस उशीरा सुटने ही बाब नित्याची झाल्याने बर्याच वेळा प्रवाशी व अधिकार्यानमध्ये वाद निर्माण होतात एकंदरीत यासर्व घडामोडीमध्ये आगारातील बसेस वेळेवर सुटत नसल्यानेच प्रवाशी खोळंबा व इतर गोष्टी घडतात सकाळी नउ वाजताची बस दुपारी दोन वाजता तर एकाच ठिकाणी जाणार्या दोन दोन बसेस एकाच वेळी सोडण्याचा अफलातून प्रकार आगारात पहावयास मिळतो. कित्येक वेळा दुपारी चार वाजताची अकोला गाडी साडेपाचच्या अकोला गाडी सोबत दोन्ही बस एकाच वेळी योग्य नियोजना अभावी पाठविल्या जातात केवळ आगारा किमी रद्द होवू नये या करिता एक गाडी रिकामी पाठविल्या जाते. या सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात प्रभारी आगार व्यवस्थापक कमी पडत असल्यानेच रिसोड आगाराचे ताळतंत्र बिघडले आहे.