शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

१९१.१७ कोटी रुपयांचा आराखडा

By admin | Updated: February 6, 2016 02:28 IST

वाशिम जिल्हा वार्षिक योजनेसाठी १0६ कोटी रुपये अतिरिक्त निधीची मागणी.

वाशिम : राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २0१६-१७ च्या राज्यस्तरीय बैठकीत वाशिम जिल्ह्यासाठी १0६ कोटी ६३ लक्ष ९७ हजार रुपये अतिरिक्त निधीची मागणी सादर करण्यात आली. तसेच जिल्ह्याचा एकूण १९१ कोटी १७ लक्ष ९७ हजार रुपये निधीचा आराखडा सादर करण्यात आला. वाशिमचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभाग (वित्तीय सुधारणा) प्रधान सचिव विजय कुमार, विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांच्यासह आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी आदी उपस्थित होते. राहुल द्विवेदी यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २0१६-१७ आराखड्याचे सादरीकरण केले. ते म्हणाले, सन २0१६-१७ च्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी ८४ कोटी ५४ लक्ष रुपयांची कमाल र्मयादा देण्यात आली होती. त्यानुसार आराखडा तयार केला. अंमलबजावणी यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार जिल्ह्याला १0६ कोटी ६३ लक्ष ९७ हजार रुपयांचा अतिरिक्त निधी आवश्यक आहे. कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामाजिक सेवा, सामान्य सेवा आणि नाविन्यपूर्ण योजनांवर हा अतिरिक्त निधी खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्याचा एकूण १९१ कोटी १७ लक्ष ९७ हजार रुपये निधीचा आराखडा सादर करण्यात आला. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून झालेल्या कामांची माहिती घेतली. कामांना पुरेसा निधी शासन उपलब्ध करून देत आहे. मात्र सर्व कामांचा दर्जा व गुणवत्ता चांगली ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच वाशिम जिल्ह्याच्या अतिरिक्त निधी मागणीच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यावेळी त्यांनी श्री क्षेत्र लोणी आराखडा, श्रीक्षेत्र पोहरादेवी आराखडाविषयी माहिती घेतली.