तालुक्यातील शिरपूर जैन येथील हजारो वीजग्राहकांकडे वीज वितरणची तीन कोटींहून अधिक थकबाकी आहे. वीजग्राहक वीजबिल भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने वरिष्ठ स्तराहून थकीत वीजबिल वसुलीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यानुसार १९ जानेवारी रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश ढंगारे, मालेगाव शाखा अभियंता अनिल जीवनाणी, उपव्यवस्थापक विक्रांत गेडाम, शहर कनिष्ठ अभियंता अर्जुन जाधव, वीज कर्मचारी गणेश पांडव, गणेश बाविस्कर, सचिन बयस, ईश्वर बयस, मंगेश वानखेडे हे शिरपूर येथील थकीत वीजग्राहकांच्या घरी व दुकानाला भेट देऊन थकीत वीजबिल वसुली करीत आहेत तसेच थकीत बिल न भरणाऱ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारासुद्धा देत आहेत. तीन कोटी तीस लाख या रकमेत चालू महिन्याचे सत्तावीस लाख रुपयाचासुद्धा समावेश आहे.
ग्राहकांकडे तीन कोटी ३० लाख रुपये थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:39 IST