शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

ब्लड कॅन्सरग्रस्त रोहितला मिळाला मदतीचा हात

By admin | Updated: July 10, 2017 19:50 IST

रक्त पुरविण्याची जबाबदारी: रुग्णसेवा ग्रुप शेलूबाजार व एकता बचत गट वाशिमचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील बोरी मापारी येथील १३ वर्षीय चिमुकल्या रोहीत भाष्कर कांबळे या ब्लड कॅन्सर ग्रस्त मुलाच्या उपचारासाठी लागणारे रक्त पुरविण्याची जबाबदारी रुग्ण सेवा गृप यांनी घेतली असून, १० हजार ५०० रुपयाची रोख रक्कम रोहीतचे आजोबा प्रल्हाद कांबळे, यांच्याकडे दिली  आहे. याच बरोबर वाशिम येथील एकता पुरुष बचत गट आणि मित्र मंडळाच्यावतीने रोहितच्या वडिलांच्या बँक खात्यावर ५ हजार १०० रुपयाची मदत जमा केली आहे. या सदंर्भात लोकमतने  २ जुलै रोजी ह्यब्लड कॅन्सरग्रस्त रोहितच्या उपचारासाठी मदतीची हाकह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित मदतीचे आवाहन केले होते. वाशिम तालुक्यातील बोरी मापारी येथील भाष्कर कांबळे व मायावती कांबळे या शेतमजुरांचा जन्मजात कुशाग्र बुद्धीचा मुलगा रोहितने आई वडील निरक्षर असताना आपल्या बुद्धीच्या जोरावर परीक्षा उत्तीर्ण करून नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला; परंतु नियतीचा डाव काही वेगळा होता, हे कुणाला ठाऊक. मातापिता त्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत गरीबी विसरून आनंदात जीवन कंठीत असतानाच रोहितला ब्लड कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी पोटच्या गोळ्याचा जीव वाचविण्यासाठी पोट उपाशी ठेवत त्याला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दोन महिन्यापूर्वी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे; परंतु घरची परिस्थीती जेमतेम असल्याने त्याच्या उपचारात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्याला औषध, सकस, आहारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. या संदर्भात लोकमतमध्ये २ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून दानशुरांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते याची दखल  एकता पुरुष बचत गट व मित्र मंडळ वाशिमने घेवून रोहीतच्या वडीलाच्या खात्यावर ५ हजार १०० रुपयाची मदत जमा केली, तर शेलूबाजार येथील रुग्ण सेवा ग्रुपने रोहीतला लागणारे रक्त पुरवण्याची जबाबदारी उचलली, तसेच याच ग्रुपचे सुरेशचंद्र कर्नावट, डॉ.प्रविण मुरले, रवि फाजे, सुरेंद्र राऊत, पंकज गाडेकर, महेश सावके, ज्ञानेश्वर सावके, अर्जुन भिमराव सुर्वे, उमेश मसोडकर, प्रमोद चव्हाण, विठ्ठल गावंडे, उमेश सुर्वे, विकेश पानझाडे, राजू सुरजे, मंगेश फड, सोपान सावके, शिवा राजेश सावके यांनी रोहीतचे आजोबा प्रल्हाद कांबळे यांच्याकडे लोकमतच्या वाशिम कार्यालयात येऊन १० हजार ५०० रुपयाची आर्थिकमदतही दिली.