शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरओ प्लांट बंद; नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

संतोष वानखडे वाशिम : शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध ...

संतोष वानखडे

वाशिम : शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध केली. परंतु, सद्यस्थितीत ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमधील आरओ प्लांट बंद असल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार तसेच साथरोग उद्भवण्याची दाट शक्यता असते. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून जिल्ह्यातील ४९१ पैकी जवळपास ३०० च्यावर ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगांतर्गतच्या निधीतून आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध केली. परंतु, अल्पावधीतच अनेक आरओ प्लांट बंद पडले. बंद पडलेले आरओ प्लांट काही ग्रामपंचायतींनी सुरू केले तर काही ग्रामपंचायतींनी याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रश्न उपस्थित करून बंद असलेले आरओ प्लांट त्वरित सुरू करण्याकडे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावर बंद पडलेले आरओ प्लांट तातडीने सुरू करण्याचे निर्देश ना. देसाई यांनी दिले. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे व मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनीदेखील आढावा घेत आरओ प्लांट सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. तथापि, ग्रामपंचायतींनी बंद पडलेले आरओ प्लांट सुरू करण्याकडे अद्यापही दुर्लक्षच चालविले असल्याचे दिसून येते. आरओ प्लांट बंद असल्याने पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्याने तहान भागविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

०००००००००००

नागरिकांच्या तक्रारींची दखल केव्हा घेणार?

ग्रामपंचायतींनी सुरू केलेले काही आरओ प्लांट बंद पडल्यासंदर्भात नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटणी, पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे तक्रारी केल्या. जिल्ह्यातील काही गावात बंद असलेले शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरओ प्लांट त्वरित दुरुस्त करून ग्रामस्थांना तेथून पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी १५ ऑगस्ट रोजी दिले होते. मात्र, अद्यापही काही गावात आरओ प्लांट सुरू न झाल्याने तक्रारींची दखल केव्हा घेणार? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

००००००००००००००००००

दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवले तर?

पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याची दाट शक्यता असते. सध्या तापाने जिल्हा फणफणत असून, दूषित पाण्यामुळे यामध्ये आणखीच भर पडण्याची चिन्हे आहेत. दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवले तर याला ग्रामपंचायतींचे दिरंगाईचे धोरणच कारणीभूत राहील, असा इशाराही गावक-यांनी दिला.

००००००००००००००००

कोट बॉक्स

१४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनी शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध केली. काही ठिकाणी आरओ प्लांटमध्ये बिघाड झाल्याने बंद पडल्याबाबत तक्रारी होत्या. बंद पडलेले आरओ प्लांट दुरुस्त करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने आढावा घेतला असून, संबंधितांना सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी.

- डॉ. श्याम गाभणे

अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम