शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर साइड इफेक्ट्सचा धोका; औषधी काळजीपूर्वक घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:43 IST

वाशिम : उपचारादरम्यान रेमडेसिविर, स्टेरॉइडसह अन्य औषधींचा मारा अधिक प्रमाणात झाल्याने आणि विषाणूमुळे फुप्फुसे कमजोर होत असल्याने कोरोनानंतरचे साइड ...

वाशिम : उपचारादरम्यान रेमडेसिविर, स्टेरॉइडसह अन्य औषधींचा मारा अधिक प्रमाणात झाल्याने आणि विषाणूमुळे फुप्फुसे कमजोर होत असल्याने कोरोनानंतरचे साइड इफेक्ट्स समोर येत आहेत. त्यामुळे औषधी काळजीपूर्वक घेण्याबरोबरच कोरोनानंतर कोणतेही लक्षण आढळून आले, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरत आहे.

पहिल्या लाटेनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. वाशिम जिल्ह्यातही दैनंदिन ४५०च्या आसपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तीव्र स्वरूपाची लक्षणे असणारे रुग्ण सरकारी, तसेच खासगी कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल होतात. कोरोनावर हमखास उपचार व औषधी नसल्याने उपचारादरम्यान रेमडेसिविर, स्टेरॉइड यासह अन्य औषधींचा वापर करण्यात येतो. कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण अधिक असल्यास त्याचा थेट फुप्फुसांवर परिणाम होतो. कोरोनामध्ये प्रमुख ट्रीटमेंट म्हणून स्टेरॉइडचा वापर केला जातो. स्टेरॉइडचा सर्वात घातक परिणाम म्हणजे यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. स्टेरॉइडचा अधिक प्रमाणात वापर झाल्यास बुरशीचा (म्युकरमायकोसिस) आजार होण्याची शक्यता अधिक असते. रेमडेसिविर व स्टोरॉइडचा अधिक प्रमाणात वापर झाल्याचे दुष्परिमाण काही रुग्णांमध्ये समोर येत असून, खासगी कोविड रुग्णालयात संबंधित रुग्णांना पुन्हा उपचार घ्यावे लागल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. कोरोनानंतरही जीव घाबरणे, किडनी व यकृतावर सूज येणे, श्वास घ्यायला अडचणी, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, मानसिक आजारही जडत असल्याचे काही रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे तज्ज्ञ खासगी डॉक्टरांनी सांगितले.

०००००००

१) रेमडेसिविरचे साइड इफेक्ट

एचआरसीटी स्कोरनुसार रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाते. काही रुग्ण व नातेवाइकांच्या आग्रहास्तवही रेमडेसिविर इंजेक्शनचा मारा केला जातो. उपचारादरम्यान रेमडेसिविरचा मारा अधिक झाला, तर घाबरणे, थंडी ताप येणे, किडनी व यकृतावरील सूज वाढत जाते. कोरोनाबाधिताला किडनी व यकृताचा आजार असेल, तर शक्यतोवर रेमडेसिविर इंजेक्शन देऊ नये, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. रेमडेसिविरचे साइड इफेक्ट झालेल्या जवळपास २० ते ३० रुग्णांवर खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.

००००००००००

२) स्टेरॉइडचे साइड इफेक्ट

स्टेरॉइड हा एक रासायनिक पदार्थ आहे. कोरोना उपचारामध्ये सध्यातरी स्टेरॉइडची प्रमुख ट्रीटमेंट आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते, वारंवार संसर्ग होणे; याबरोबरच बुरशीजन्य आजार (म्युकरमायकोसिस) होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. मधुमेह असणाऱ्या रुग्णाला डोकेदुखीचा त्रास वाढतो, डोळा सुजतो. खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये या लक्षणाचे जवळपास ७ ते ८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

००००००

काय होतात परिणाम

कोरोना उपचादरम्यान विविध औषधांचा वापर केला जातो. अधिक मात्रेत औषधीचा वापर झाला, तर त्याचे काही दुष्परिणामही दिसून येतात. स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने वातावरणातील बदलामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतरही वारंवार सर्दी, खोकला, डोकेदुखी व काही प्रमाणात तापही येतो. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अशक्तपणा, चालताना धाप लागणे, रक्तात अल्प प्रमाणात गाठी होणे, अशी लक्षणे असलेले काही रुग्ण पुन्हा खासगी दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याचे जिल्ह्यात दिसून येते.

००००

वेळीच सावध व्हा

कोरोनातून बरे झाल्यानंतरही काही जणांना फुप्फुस संसर्ग, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे दिसून येते. कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांनी व्यायाम, आहार आणि पथ्ये यावर भर द्यावा. श्वास घ्यायला त्रास, नाक, डोळा किंवा दात यासंबंधी कोणताही आजार उद्भवला, तर वेळ न दवडता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्यावा. वेळीच निदान होणे महत्त्वाचे असते.

- डॉ.सचिन पवार

हृदयरोग तज्ज्ञ, वाशिम

00000

कोरोनानंतरही डोकेदुखी, रक्तात गाठी होणे, दमा, लकवा, मानसिक आजार जडत असल्याचे समोर येत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी घेऊ नये. कोरोनातून बरे झाल्यानंतर फुप्फुस संसर्ग किंवा चक्कर येणे, दम लागणे यासह अन्य लक्षणे आढळून आली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ.प्रवीण ठाकरे

छातीरोग तज्ज्ञ, वाशिम

०००००००००