शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड नगर परिषदेला एक कोटीचे बक्षीस 

By admin | Updated: April 3, 2017 13:45 IST

शहर हागणदरीमूक्त केल्याबद्दल रिसोड नगर पालिकेला शासनाकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

शहर हागणदरीमूक्त: ३० लाखांचा पहिला हप्ता प्राप्तवाशिम: महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून शहर हागणदरीमूक्त केल्याबद्दल रिसोड नगर पालिकेला शासनाकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.  त्यामधील ३० लाखांचा पहिला हप्ता नगर परिषदेला प्राप्त झाल्याची माहिती मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सोमवारी दिली. रिसोड शहरात सन २०१५ पासून स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन इत्यादि बाबींचा समावेश करण्यात आला. त्यानुसार शहरातील ज्या कुटुंबांकडे शौचालय अशा कुटुंबांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले. त्यानंतर उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर गुडमॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकाद्वारे कारवाई केली. रिसोड शहर स्वच्छ व हगणदरीमूक्त करण्यासाठी समितीने शासनास सादर केला. त्यानुसार १६ मार्च २०१७ व १७ मार्च २०१७ ला राज्यस्तरीय समितीमार्फत पडताळणी करण्यात आली. यामध्ये नगर परिषद शाळा, वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय नवीन सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन तसेच शहरातील उघड्यावर शौचास जाण्याच्या जागांची पाहणी या पथकाने केली आणि नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये शहर हागणदरीमूक्त झाल्याचा रिसोड नगर परिषदेचा दावा खरा असल्याचे त्या पथकाला आढळले. त्यानुसार शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला. त्या अहवालावरून नगर विकास विभागाने रिसोड शहर हागणदरीमूक्त झाल्याचे जाहीर केले आणि शहराला त्याबद्दल एक कोटी रुपयाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.