शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रिधोरा पाइपलाईन तोडफोडप्रकरणी कारवाईचे निर्देश!

By admin | Updated: April 27, 2017 00:27 IST

मालेगाव : तालुक्यातील रिधोरा येथे जिल्हा विकास योजनेअंतर्गत रस्ता दुरुस्ती व माती भराव काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराकडून पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनची तोडफोड करण्यात आली.

मालेगाव : तालुक्यातील रिधोरा येथे जिल्हा विकास योजनेअंतर्गत रस्ता दुरुस्ती व माती भराव काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराकडून पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे निेर्देश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत. मौजे रिधोरा येथे जिल्हा विकास योजना ३०५४ अंतर्गत रिधोरा ते गोकसावंगी या रस्त्याची दुरूस्ती व भरावचे काम जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मालेगावअंतर्गत गणेश देशमुख नामक कंत्राटदाराकडून सुरु आहे. काम करताना ठेकेदाराकडू उर्ध्व मोर्णा प्रकल्पावरुन रिधोरा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजनेची एक किलोमिटरची पाईपलाईन जेसीबी मशिनव्दारा खोदकाम करताना फोडल्या गेली. त्यामुळे उन्हाळयाच्या दिवसात ग्रामस्थांना भेडसावणारी पाणी समस्या अधिकच गंभीर झाली. या बाबीची दखल घेत ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांनी संबंधिताकडे १५ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली; तर भारीप बहूजन महासंघाचे मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप सावळे यांनी देखील १९ एप्रिल रोजी दाखल करुन पाईपलाईन तोडफोड प्रकरणी संबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरपाई घेवून दोषीवर गुन्हा दाखल करावा व पाणीपुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली होती. तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधितांकडून झालेल्या पाईपलाईन तोडफोडप्रकरणी नुकसान भरपाई किंवा नव्याने पाईप लाईन टाकण्याबाबतचे निर्देश दिले असून सदर काम मुदतीत पूर्ण न झाल्यास पुढील कारवाई करण्याचे आदेश आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पाईपलाईन तोडफोड प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होणार नाही.- संतोष मार्के, अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प., वाशिम--