शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांकडून मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:09 IST

राज्यात दि. १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकवर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ आॅक्टोंबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत होते आहे.  विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक पियुष सिंह यांनी गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा आढावा घेतला.

ठळक मुद्देअधिका-यांना मार्गदर्शन१८ वर्षाच्या व्यक्तींना समाविष्ट करण्याचे निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यात दि. १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकवर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ आॅक्टोंबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत होते आहे.  विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक पियुष सिंह यांनी गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी वाशिम जिल्ह्यातील वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख व सर्व तहसीलदार उपस्थित होते.विभागीय आयुक्त सिंह म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये पुरुष व महिला मतदारांचे लिंग गुणोत्तर प्रमाण हे जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या लिंग गुणोत्तर प्रमाणा इतके राहील, याची दक्षता घ्यावी. यासाठी महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेली मयत मतदार, दुबार नाव नोंदणी असलेले मतदार व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुद्धा या दरम्यान करणे आवश्यक आहे. ही कार्यवाही करताना योग्य ती शहानिशा केल्यानंतरच मतदारांची नावे वगळावी. मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ८ व २२ आॅक्टोंबर २०१७ रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ८ आॅक्टोंबर २०१७ रोजी नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे, तसेच २२ आॅक्टोंबर २०१७ रोजी दिपावली सण असल्याने आता या दोन दिवसांबरोबरच २९ आॅक्टोंबर २०१७ रोजी सुध्दा मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी या दिवशी जास्तीत जास्त नवीन मतदारांची नोंदणी होईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.