रिसाेड : सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक सुरू असून त्यानिमित्त शुक्रवार १३ ऑगस्टला रिसोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्या जनसंपर्क कार्यालयावर या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस बाबाराव पाटील खडसे तर प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे , पक्ष निरीक्षक डॉ. संजय रोडगे, जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील खडसे, तालुका अध्यक्ष तेजराव पाटील वानखेडे, कैलास पाटील खांनझोडे, शुभदा नायक होते. यावेळी रिसोड तालुक्यातील संपूर्ण पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला . यावेळी अनेकांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी मान्यवरांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी कैलास खानझोडे, मंदाताई देशमुख, शुभदा नायक, सुभाष बोरकर, रवी नरवाडे, नितीन सरकटे, रमेश सदार, पुरुषोत्तम नरवाडे, गजानन बाजड, शालिक्रम शिंदे, बंडूभाऊ हाडे ,संदीप पाचरणे, गजानन तिडके, नीलेश बोडखे, भगवान जाधव, गणेश चोपडे, आनंत देशमुख, प्रताप गवळी, गजानन सरनाईक , मुरली जुनघरे ,भागवत बोडखे,भगवान जाधव ,भानुदास मवाळ यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
रिसोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST