यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. संदीप हेडाऊ, एस. टी. आगार व्यवस्थापक वाशिम यांचे प्रतिनिधी, युनिसेफ कन्सलटंट डॉ. शैलेश पाटील, आरोग्य विभागाच्या एस. पी. चव्हाण, लसीकरण यंत्र संनियंत्रक संतोष इंगळे व मंगला लाटकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. म्हणाले, १६ जानेवारीपासून सुरू होणारी कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि वीज वितरण कंपनीने आरोग्य यंत्रणेशी कोरोना लसीकरणासाठी योग्य समन्वय ठेवून लसीकरण मोहीम यशस्वी करावी. जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे. ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नियमितपणे कोरोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
..........................
बॉक्स :
पल्स पोलिओ मोहीम पुढे ढकलली
कोरोना लसीकरणाला देशभर १६ जानेवारीपासून सुरुवात होत असल्यामुळे १७ जानेवारीपासून राबविण्यात येणारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यंदा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी आरोग्य अधिकारी, कर्मचारी अशा सुमारे ५५०० जणांना लस देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले.
........................
बॉक्स :
पॅनकार्ड, आधारकार्ड असणे आवश्यक
लसीकरणाच्या वेळी लस घेणाऱ्यांची पोर्टलवर एंट्री करण्यासाठी संबंधित व्यक्तीने पॅनकार्ड आणि आधारकार्ड सोबत आणावे. लसीकरणाच्या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण खोली, प्रतीक्षा खोली, देखरेख खोली अशी व्यवस्था करण्यात आली आहे. लस दिल्यानंतर लाभार्थ्यास ३० मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.