शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:07 IST

वाशिम - विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला.

ठळक मुद्देविविध मागण्या प्रलंबित कामकाज ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला.पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पद सरळसेवेने भरल्यास महसुल विभागातील  अव्वल कारकुन दर्जाचे कर्मचाºयावर अन्याय होणार असून अनेक अव्वल कारकुन संवर्गातील कर्मचारी यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे परिपत्रकान्वये दिलेल्या पदभरतीच्या सुचनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने शासनाकडे यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, या मागणीवर कोणताच विचार न झाल्याने ३ आॅक्टोबरपासून  पुरवठा विभागाचे कर्मचारी कामबंद आंदोलनावर गेले आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कर्मचाºयांचादेखील सहभाग आहे. महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महसूल कर्मचाºयांनी १० आॅक्टोबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने सन २०१२ ते २०१५ या चार वर्षात राज्यात विविध टप्प्यात आंदोलन करण्यात आले होते. सन २०१३ व २०१४ मध्ये तत्कालिन उपमुख्यमंत्री, तत्कालिन महसूल मंत्री, अपर मुख्य सचिव व वित्त विभागाच्या अधिकाºयांशी महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी चर्चा केली होती. प्रलंबित मागण्यांपैकी काही मागण्या मान्य करून लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार त्यावेळी आंदोलन स्थगीत करण्यात आले होते, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेने केला. या आश्वासनाला तीन वर्षे झाले, मात्र अद्यापही कार्यवाही नसल्याने महसूल कर्मचाºयांमधून असंतोष व्यक्त होत आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १० आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, वाशिम जिल्ह्यातील महसूल कर्मचारी, पदोन्नत नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयातील महसूलविषयक कामकाज ठप्प झाले.