शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

महसूलची वसुली ६१ टक्के!

By admin | Updated: March 3, 2017 00:37 IST

प्रशासनाची कसरत : उद्दिष्टपूर्तीसाठी उरला केवळ एक महिना

वाशिम, दि.२ -  जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षासाठी शासनाकडून ४३.५१ कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आर्थिक वर्षातील शेवटच्या महिन्यापर्यंत त्यापैकी केवळ २८.९३ लाख रुपये महसूल गोळा झाला असून, त्याचे प्रमाण ६६.५० टक्के आहे. आता उर्वरित महिनाभरात शिल्लक राहिलेले १४.५७ कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

वाशिम जिल्ह्याला २०१६-१७ या वर्षासाठी जमीन महसूल, करमणूक कर व गौण खनिज वसुली मिळून एकूण ४३.५१ कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या महसुलाच्या वसुलीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करून उद्दिष्ट गाठण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे आणि सर्वच उपविभागीय महसूल अधिकारी आणि तहसीलदारांसह महसूल वसुलीसाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांनंतरही महसूल प्रशासनाला २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत केवळ २८ कोटी ९३ लाख ५६ हजारांची वसुली करणे शक्य झाले. यात खनि कर्म वसुलीच्या २ कोटी ३० लाख ५३ हजारांसह वाशिम तालुक्यात निर्धारित १०.५४ कोटींच्या उद्दिष्टापैकी ९ कोटी २३ लाख ५३ हजार, कारंजा तालुक्यातील निर्धारित ९ कोटी ४७ लाख २४ हजारांच्या उद्दिष्टापैकी ६ कोटी ३० लाख ७६ हजार, रिसोड तालुक्यातील ६ कोटी ३३ लाखांपैकी ३ कोटी ८९ लाख, मंगरुळपीर तालुक्यातील ६ कोटी २९ लाखांपैकी ३ कोटी ८५ लाख ७० हजार, मालेगाव तालुक्यातील ५ कोटी ४७ लाखांपैकी २ कोटी ०४ लाख ११ हजार, तर मानोरा तालुक्यातील ५ कोटी ४१ लाखांपैकी १ कोटी २९ लाख ९३ हजारांच्या वसुलीचा समावेश आहे. आता उर्वरित १४ कोटी ४८ लाख रुपयांच्या महसूल वसुलीसाठी सर्वच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यापर्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जमीन महसूल, करमणूक कर व गौण खनिजाची वसुली करण्यात येत आहे. तथापि, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केवळ महिनाभराचा कालावधी उरला असल्याने या कालावधीत प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, यावर्षी नगरपालिका निवडणुकांसह पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जिल्हा प्रशासन व्यस्त असल्याने महसूल वसुलीवर विशेष लक्ष त्यांना देता आले नाही. तथापि, २९ दिवसांत उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. विभागीय आयुक्तांनी घेतला आढावामहसूल वसुलीसंदर्भात गुरुवारी महसूल विभागाच्या आयुक्तांनी अमरावती येथे सर्वच जिल्ह्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महसूल वसुलीचा आढावा घेण्यासह उर्वरित काळात निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह महसूल विभागाच्या इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.