शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महसूलची वसुली ६१ टक्के!

By admin | Updated: March 3, 2017 20:25 IST

वाशिम जिल्हा प्रशासनाची कसरत; उद्दिष्टपूर्तीसाठी उरला केवळ एक महिना.

वाशिम: जिल्ह्याला सन २0१६-१७ या वर्षासाठी शासनाकडून ४३.५१ कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आर्थिक वर्षातील शेवटच्या महिन्यापर्यंत त्यापैकी केवळ २८.९३ लाख रुपये महसूल गोळा झाला असून, त्याचे प्रमाण ६६.५0 टक्के आहे. आता उर्वरित महिनाभरात शिल्लक राहिलेले १४.५७ कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.वाशिम जिल्ह्याला २0१६-१७ या वर्षासाठी जमीन महसूल, करमणूक कर व गौण खनिज वसुली मिळून एकूण ४३.५१ कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या महसुलाच्या वसुलीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करून उद्दिष्ट गाठण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे आणि सर्वच उपविभागीय महसूल अधिकारी आणि तहसीलदारांसह महसूल वसुलीसाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांनंतरही महसूल प्रशासनाला २८ फेब्रुवारी २0१७ पर्यंत केवळ २८ कोटी ९३ लाख ५६ हजारांची वसुली करणे शक्य झाले. यात खनि कर्म वसुलीच्या २ कोटी ३0 लाख ५३ हजारांसह वाशिम तालुक्यात निर्धारित १0.५४ कोटींच्या उद्दिष्टापैकी ९ कोटी २३ लाख ५३ हजार, कारंजा तालुक्यातील निर्धारित ९ कोटी ४७ लाख २४ हजारांच्या उद्दिष्टापैकी ६ कोटी ३0 लाख ७६ हजार, रिसोड तालुक्यातील ६ कोटी ३३ लाखांपैकी ३ कोटी ८९ लाख, मंगरुळपीर तालुक्यातील ६ कोटी २९ लाखांपैकी ३ कोटी ८५ लाख ७0 हजार, मालेगाव तालुक्यातील ५ कोटी ४७ लाखांपैकी २ कोटी 0४ लाख ११ हजार, तर मानोरा तालुक्यातील ५ कोटी ४१ लाखांपैकी १ कोटी २९ लाख ९३ हजारांच्या वसुलीचा समावेश आहे. आता उर्वरित १४ कोटी ४८ लाख रुपयांच्या महसूल वसुलीसाठी सर्वच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यापयर्ंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जमीन महसूल, करमणूक कर व गौण खनिजाची वसुली करण्यात येत आहे. तथापि, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केवळ महिनाभराचा कालावधी उरला असल्याने या कालावधीत प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, यावर्षी नगरपालिका निवडणुकांसह पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जिल्हा प्रशासन व्यस्त असल्याने महसूल वसुलीवर विशेष लक्ष त्यांना देता आले नाही. तथापि, २९ दिवसांत उद्दिष्ट गाठण्याचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.