शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘महसूल’चे कामकाज ठप्प

By admin | Updated: December 11, 2015 02:31 IST

नायब तहसीलदार, तहसीलदार सामूहिक रजेवर गेल्याने सर्वसामान्य जनतेची गैरसोय झाली.

वाशिम: नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकारी पदाचा दर्जा देताना, वेतनश्रेणीत कोणतीही सुधारणा केली नसल्याच्या निषेधार्थ १0 डिसेंबरला जिल्हय़ातील तहसीलदार व नायब तहसीलदार सामूहिक रजेवर गेले. परिणामी, संपूर्ण जिल्हय़ातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प होऊन सर्वसामान्यांची गैरसोय झाली. महसूल विभाग हा शासनाचा महत्त्वाचा कणा समजला जातो. तालुकास्तरावर या विभागाची जबाबदारी नायब तहसीलदार, तहसीलदार या दर्जाच्या अधिकार्‍यांवर शासनाने सोपविली आहे. सन १९९८ पर्यंंंत नायब तहसीलदारांना वर्ग तीनचा दर्जा होता. नायब तहसीलदारांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याप्रमाणे वर्ग दोन आणि राजपत्रित अधिकारी पदाचा दर्जा देण्याची मागणी वारंवार झाल्याने १९९८ मध्ये वर्ग दोनचा दर्जा देऊन राजपत्रित अधिकारी केले; मात्र या दर्जानुसार वेतनश्रेणीत सुधारणा केली नाही. वेतनश्रेणीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी नायब तहसीलदार-तहसीलदार संघटनेने राज्यभर आंदोलनाची हाक दिली. या मागणीसाठी आंदोलनाचा पहिला भाग म्हणून ५ नोव्हेंबर २0१५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने आपल्या भावना पोचविल्या होत्या. यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शासन लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ १0 डिसेंबरला सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार सामूहिक रजेवर गेले. या आंदोलनाला उपजिल्हाधिकारी संघटनेने पाठिंबा दर्शविला. परिणामी, गुरुवारी दिवसभर महसूल विभागाचे कामकाज ठप्प राहिले. वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड, मालेगाव तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूलच्या सर्व विभागाचे कामकाज होऊ शकले नाही. विविध कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना नायब तहसीलदार व तहसीलदार कार्यालयात नसल्याने खाली हात परत जावे लागले. दरम्यान, या आंदोलनात मालेगाव येथील तहसीलदार व नायब तहसीलदार सहभागी असल्याचे दिसून आले नाही. मालेगाव नगर पंचायत निवडणूक असल्याने ते कर्तव्यावर हजर असल्याचे दिसून आले.