वाशिम : निवडणुकीची धावपळ आटोपत नाही; तोच जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी हातात झाडू घेऊन स्वत:पासून स्वच्छतेच्या कामाचा श्रीगणेशा केला. २0 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कुलकर्णी यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी हाती झाडू घेवून इतर अधिकारी व कर्मचार्यांना प्रोत्साहन दिले. तसेच दिवाळीनिमित्त सर्व कर्मचार्यांनी कार्यालय, घर व परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहनही केले. या मोहिमेमध्ये उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बी.के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी डी. एम. गिरी, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, आत्माचे संचालक विजय चवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. अधिकारी व कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील सर्व कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाढलेली झुडपेही यावेळी तोडण्यात आली.
महसूल अधिका-यांनी केला स्वच्छतेचा संकल्प
By admin | Updated: October 23, 2014 01:03 IST