शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिका-यास तीन वर्षाचा सश्रम कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 20:41 IST

मालेगाव येथील ग्राम पंचायतच्या काही सदस्यांना अपात्र करण्याकरिता तत्कालीन अपात्र सरपंचाकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा आता सेवानिवृत्त झालेले बलदेव राठोड यांना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश के.क़े.गौर यांनी ५ सप्टेंबर रोजी सुनावली.

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाललाचलुचपतचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मालेगाव येथील ग्राम पंचायतच्या काही सदस्यांना अपात्र करण्याकरिता तत्कालीन अपात्र सरपंचाकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा आता सेवानिवृत्त झालेले बलदेव राठोड यांना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश के.क़े.गौर यांनी ५ सप्टेंबर रोजी सुनावली.फिर्यादी रामकिशोर जैस्वाल, रा.मालेगाव या तत्कालीन अपात्र सरपंचाने ६ फेबु्रवारी २००२ रोजी घडलेल्या घटनेची फिर्याद दिली होती. रामकिशोर जैस्वाल यांनी मालेगाव ग्रामपंचायतचे काही सदस्य अपात्र करण्याकरिता तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी राठोड यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणी तत्कालीन ग्रा.पं.सदस्य संजय आनंदा गर्जे, राजु गणपत काटे, शोभा नारायण खिल्लारे व रामचंद्र संपत बळी या चार ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्यात यावे, अशी याचीका तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी राठोड यांच्याकडे दाखल केली होती. या चार सदस्यांना अपात्र केल्यानंतर सरपंच पदावरुन अपात्र झालेले रामकिशोर जैस्वाल यांची पुन्हा सरपंचपदी नियुक्ती होवुन त्यांच्या बाजुने निकाल लागला. त्यामुळे जैस्वाल यांनी सदर प्रकरणात राठोड यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन व विचारणा करुन निकाल देण्याबाबत प्रयत्न केले. यामुळे ५ फेबु्रवारी २००२ ला आरोपी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी बलदेव राठोड यांनी याचिका निकाली काढण्यासाठी जैस्वाल यांच्याकडे २५ हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. यापैकी ५ हजार रुपये ६ फेबु्रवारी २००२ ला द्यावे व उर्वरीत रक्कम निकाल लागल्यानंतर द्यावी, असे म्हटले. यावरुन जैस्वाल यांनी त्याचदिवशी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली. त्यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ६ फेबु्रवारी २००२ ला सापळा रचुन तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी राठोड यांच्या शासकीय निवासस्थानी ५ हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७, १३,(१) (ड) व १३, (२) (ड) अन्वये गुन्हा दाखल करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सदर प्रकरणी न्यायालयाने तीन साक्षीदार तपासले. साक्षीपुराव्यावरुन गुन्हा सिध्द झाल्याने आरोपी राठोड हे दोषी आढळुन आल्याने न्यायाधीश गौर यांनी कलम ७ मध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न  भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावास; तर कलम १३ (१) (ड) व १३ (२) (ड) मध्ये तीन वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. सदर दोन्ही शिक्षा  आरोपीस एकत्र भोगावयाच्या आहेत. सदर प्रकरणात सरकारतर्फे  सरकारी वकील अ‍ॅड. अभिजीत व्यवहारे यांनी बाजू मांडली