वाशिम : सीबीएसई इयत्ता दहावीचा निकाल २८ मे रोजी लागला असून यामध्ये शहरातील नवोदय विद्यालयाचा निकाल १00 टक्के लागला आहे. वाशिम शहरात सी.बी.एस.सी पॅटर्न राबविणारी जवाहर नवोदय विद्यालय शाळा असून या शाळेतील ८0 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली. ८0 ही विद्यार्थी उर्तीण झाले असून यामध्ये ग्रेड ए १ मध्ये दहा विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले आहे. ईतरही विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले आहे.
नवोदयचा दहावीचा निकाल १00 टक्के
By admin | Updated: May 29, 2015 02:28 IST