शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विषारी फवारणीमुळे शेतजमीन व पिकांवर परिणाम

By admin | Updated: January 20, 2015 00:40 IST

सेंद्रिय शेतीचा वापर कमी प्रमाणात: पिके घेण्याच्या पद्धतीत बदल आवश्यक.

वाशिम : पिकांवरील रोगराईचा नाश व्हावा, याकरिता विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे जिल्हय़ात चित्र आहे. या विषारी कीटकनाशकांमुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असला तरी शेतकर्‍यांकडे याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकर्‍यांशी केलेल्या चर्चेवरून दिसून आले. काही शेतकरी शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केला तर याचा फायदा मिळेल; मात्न या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरक्ष: विषाची फवारणी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता गमावून शेतीच धोक्यात आली आहे. अधिकाधिक उत्पन्न देणार्‍या बियाणांची मागणी वाढत गेल्याने बीज उत्पादन कंपन्यात चढाओढ निर्माण झाली आहे. नवनवीन वाण बाजारात येत आहे. सोबतच कीटकनाशकांची फवारणी मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतात उत्पादित होत असलेले भाजीपाला, फळे विषाक्त होत आहे. पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी धोक्याचे असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, कृषी संशोघन केंद्राचे प्रभारी अधिकारी, शिवाजी कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले. विदेशात विषारी कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आधुनिक शेतीमुळे भरघोस उत्पन्न मिळाले असले तरी हायब्रिड बियाणांमुळे धान्यांचे उत्पादन घटले आहे. आधुनिक शेतीमधील कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. सेंद्रिय शेती उत्तम असल्याने याचा प्रचार व प्रसार केल्या जात आहे; मात्र अनेक शेतकरी याचा वापरही करीत नाहीत. कृषी संशोधन केंद्र वाशिमच्यावतीने प्राप्त माहितीनुसार शक्यतोवर विषारी कीटकनाशकाची फवारणी टाळण्यात यावी. आवश्यक असल्यास कमी विषारी असलेल्या फवारण्या कराव्यात. तसेच एकच एक पीक न घेता पिकात बदल केल्यास शेतजमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. जिल्हय़ात सोयाबीननंतर हरभरा हेच पीक जास्त प्रमाणात घेतल्या जाते, हेच आलटून पालटून गहू, ज्वारी, मका अशी पिके घेतल्यास कीटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, त्यामुळे शेतकर्‍यांना याचा अवलंब करणे गरजेचे आहे.