शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल योजनेला रेतीघाटांचा लगाम

By admin | Updated: November 25, 2015 02:20 IST

शासनाच्या शौचालय बांधकामातही अडथळा.

संतोष वानखडे / वाशिम : हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला शौचालय बांधकामात, रखडलेल्या रेतीघाट लिलावाचा मोठा अडसर ठरत आहे. यामुळे अनेक घरकुल आणि शौचालय बांधकामाचे बांधकाम ठप्प असून, उद्दिष्टपूर्तीसाठी लाभार्थ्यांंना नाइलाजास्तव अवैध रेती वाहतुकीकडे वळावे लागत आहे.हगणदरीमुक्तीबरोबरच स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. सन २0१५-१६ या वर्षात वाशिम जिल्हय़ात २५ हजार शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. ९ ऑगस्ट २0१५ पासून जिल्हा परिषदेने ह्यसंपूर्ण स्वच्छतेची ऑगस्ट क्रांतीह्ण या नावाने शौचालय बांधकामाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, नेमके रेतीघाटाचा रखडलेला लिलाव ह्यगतिरोधकह्ण निर्माण करीत आहे. कारंजा तालुक्यात १४ हजार ३४७ घरकुलांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत १५00 घरकुलांचे काम पूर्ण झाले. जिल्हय़ात २0१५-१६ या वर्षात ऑक्टोबरअखेर पाच हजार शौचालयांचे बांधकाम झाले; मात्र रेतीघाट बंद असल्याने रेती आली कुठून, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. अवैध मार्गाने रेती चोरून आणलेल्या काही लाभार्थ्यांंना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.*शासनाच्याच दोन विभागात असमन्वयमहसूल व गौण खनिज विभागाच्या नियमानुसार शक्यतोवर नोव्हेंबर महिन्यात रेतीघाटाचा लिलाव केला जातो. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शौचालय व घरकुल बांधकाम मोहिमेला तोपर्यंंत सुरुवातही झालेली असते. रेतीघाटाचे लिलाव बंद असतानाही, दुसरीकडे मात्र शौचालय व घरकुलांचे बांधकाम सुरू असते.