शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा येथे रेस्टॉरंटमधून दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:14 IST

मानोरा :  मानोरा शहरात मंगरुळपीर रोडवर असलेल्या  आशिष रेस्टॉरंटवर मंगळवार, १ ऑगस्टच्या रात्री टाकलेल्या  धाडीत २९ हजार ७0७ रुपयांची विदेशी दारू पोलीस  निरीक्षक रामकृ ष्ण मळघने यांनी जप्त केली.

ठळक मुद्दे२९ हजार ७0७ रुपयांची विदेशी दारू जप्त मंगरुळपीर रोडवर असलेल्या ‘आशिष रेस्टॉरंट’मंगळवारी रात्री टाकली धाड 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  मानोरा शहरात मंगरुळपीर रोडवर असलेल्या  आशिष रेस्टॉरंटवर मंगळवार, १ ऑगस्टच्या रात्री टाकलेल्या  धाडीत २९ हजार ७0७ रुपयांची विदेशी दारू पोलीस  निरीक्षक रामकृ ष्ण मळघने यांनी जप्त केली. सलग दुसर्‍यांदा  शहरात पडलेल्या धाडीमुळे अवैधरीत्या चालणार्‍या बार  मालकांचे धाबे दणाणले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत  असलेल्या ५00 मीटर आतील वाईन बारला  परवानगी  नाकारली. नेमका याचाच फायदा घेत छुप्या मार्गाने  अव्वाच्या सव्वा भाव घेत देशी, विदेशी, हातभट्टी दारूची  सहज विक्री होत आहे. शहरात बंदी असतानासुद्धा सहज दारु उपलब्ध होते. प्रसार  माध्यमांनी ही गंभीर बाब उघड केली. शहरातील आशिष  रेस्टॉरंटवर विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याची गो पनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघने,  पोलीस उपनिरीक्षक राहुल काटकाडे, धर्माजी डाखोरे,  विश्‍वास वानखडे या चार अधिकार्‍यांच्या पथकाने धाड  टाकून आरोपी अविनाश प्रल्हाद वीर यांच्याकडून रात्री १0  ते ११ च्या दरम्यान पंचासमक्ष २९ हजार ७0७ रुपयांची  विदेशी दारू जप्त केली. याआधी दुसर्‍या रेस्टॉरंटवर मानोरा  पोलिसांनी धाड टाकून विदेशी दारू जप्त केली होती.  त्यामुळे अवैध दारू विक्री करणार्‍यांच्या मनात धास्ती  निर्माण झाली आहे.

दीड लाखांच्या दारूसंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागास  पत्रआशिष रेस्टॉरंटमध्ये टाकलेल्या धाडीदरम्यान परवाना  गोडावूनच्या प्रवेश व्दाराला सीलबंद असल्यामुळे त्याच  खोलीचा दुसरा दरवाजा उघडून लाखो रुपयांचा माल मानोरा  पोलिसांनी ताब्यात घेतला. ताब्यात घेतलेला माल हा राज्य  उत्पादन शुल्क विभागाचा असल्याचे रेस्टॉरंट मालकाने  सांगितल्यामुळे मानोरा पोलिसांनी संबंधित विभागाला पत्र  व्यवहार केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण  मळघने यांनी दिली.