मानोरा (जि. वाशिम ): शहरातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास देशमुख व सामाजिक कार्यकर्ते राजेश भगत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १६ एप्रिल रोजी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. तशा प्रकारचे निवेदन मानोरा तहसीलदारांना १६ एप्रिल रोजी देण्यात आले. शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी तथा भाजप कार्यकर्ते डॉ. सुहास अंबादास देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते राजेश विजय भगत यांनीही तहसीलदारांना निवेदन देऊन मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. डॉ. देशमुख यांनी गरजू रुग्णांना जीवदान मिळण्यासाठी आपले शरीरातील संपूर्ण अवयव उपयोगी पडावे, असे निवेदनात म्हटले आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अख्ये आयुष्य दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी खर्च केले. त्यांच्या याच सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन देशमुख व भगत यांनी हा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती वैद्यकीय नागपूर महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम यांनाही देण्यात आल्या.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देहदानाचा संकल्प
By admin | Updated: April 18, 2016 02:18 IST