वाशिम : आदिवासी (अनुसूचित जमाती) या समाजात अन्य कोणत्याही जातींचा समावेश करण्यात येवू नये या प्रमुख मागणीसाठी क्रांतिसूर्य बिरसावादी आदिवासी संघाच्या वतीने शनिवार २ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेला आदिवासीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. क्रांतिसूर्य बिरसावादी आदिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष भगिरथ पांडुरंग भोंडणे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येत आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते. आदिवासी समाजाचा कोणत्याही जातीला विरोध नसून आदिवासींना घटनेनुसार मिळालेल्या ७ टक्के आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जमातीचा समावेश करु नये या प्रमुख मागणीसह राज्य शासनातील बोगस आदिवासींचा भरणा कमी करुन त्या जागांवर खर्या आदिवासींना सामावून घेण्यात यावे. सर्व भूमिहीन आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, तसेच दारिद्रय़रेषेखालील आदिवासींना घरकुल देण्यात आले. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना यावेळी देण्यात आले. मोर्चामध्ये सुधाकर गिर्हे, विलास ठाकरे, चंद्रहार मैघणे, विजय लोखंड, गजानन सासणे व गजानन डाखोरे आदी पदाधिकार्यांसह मोठय़ा संख्येत आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.
आदिवासी समाज बांधवांचा आरक्षण बचाव मोर्चा
By admin | Updated: August 2, 2014 23:16 IST