पोलीस स्टेशन आसेगाव येथे ठाणेदार स्वप्नील तायडे यांनी उपनिरीक्षक किशोर खंडार यांच्यासह कर्मचा-यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. त्याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय गोटे यांनी डॉ. ऐश्वर्या मिसर तथा आरोग्य कर्मचा-यांच्या उपस्थितीत, महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता खाडे यांनी सहकर्मचा-यांच्या उपस्थितीत, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत शाखा व्यवस्थापक जोशी यांनी कर्मचा-यांच्या उपस्थितीत, ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गजानन मनवर यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत तसेच संत गाडगे महाराज माध्यमिक मराठी शाळेत सचिव नलिनीबाई दिनकरराव भगत यांच्या हस्ते महात्मा गांधीजीच्या प्रतिमेचे पूजन केले, तर सदस्य संजय रामकृष्ण नवघरे यांनी ध्वजारोहण केले. मौलाना अबुल कलाम उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत संस्था सदस्य कादर खान यांनी, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय भगत यांनी, साईबाबा इंग्लिश स्कूलमध्ये संस्थापक लखन डोइजड यांनी, तर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जावेद खान पटेल यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले.
आसेगावात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST