--------------------
जि.प. शाळा कोलार
कोलार : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक अनिल भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहाय्यक शिक्षक मनवर, घोरसडे, सहाय्यक शिक्षिका सावके, अंगणवाडी सेविका कल्पना भुसारी, अबूबाई खंडार, ग्रा.पं. कर्मचारी महादेव डापसे, आशासेविका उमा डापसे आदींची उपस्थिती होती.
-----
भगवंतराव विद्यालय गिरोली
गिरोली : येथील श्री. भगवंतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य भारत तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्राध्यापक, सहाय्यक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची उपस्थित होती.